मी जिंकले असते तर हिरो झाले असते पण ते काहींना आवडलं नसतं, पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीडमधील दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.
लातूर : लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध विजय मिळवला. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीडमधील दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, मी निवडून आले असते तर हिरो झाले असते. पण मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल.
पंकजा मुंडे यांनी मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल असं वक्तव्य केल्यानंतर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे असा सवाल विचारला जात आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, आता आक्रोश सुरूय, पण मी काय उत्तर देणार? आता जे चाललंय ते यासाठी आहे की २०१९ च्या निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी वनवास भोगला. आता लोकसभेलाही पराभव झाला. त्यामुळे माझ काही होणार नाही अशी भावना लोकांमध्ये आहे. मला काहीतरी द्या यासाठी माझी लढाई नव्हती. लोकसभेचं तिकिट जाहीर झाल्यावर मी लोकसभा लढणार असल्याचं समजलं.
advertisement
फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर ही विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. मी निवडून आले असते तर मी हिरो झाले असते आणि मी हिरो झालेलं कसं आवडेल कुणाला? मोदीजी पंतप्रधान होतील म्हणून मी लोकसभा लढवली होती अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. मी पडले म्हणून संपले का? या देशात पहिल्या पाच लोकांमध्ये मला मतदान पडले आहे. सगळं सोडून घरी बसायचं असेल तर ही विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही. फक्त इशाऱ्याकडे लक्ष ठेवा असा सूचक इशारा पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 18, 2024 1:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
मी जिंकले असते तर हिरो झाले असते पण ते काहींना आवडलं नसतं, पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?









