advertisement

Latur News : कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचा तगादा; शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:

पंढरी चपटे यांच्यावर कर्ज होते,  या कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीकडून त्यांच्यामागे तगादा लावण्यात आला होता.

News18
News18
लातूर, 5 ऑगस्ट, सचिन सोळुंके : लातूर जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पंढरी शिवाजी चपटे वय 43 असं या व्यक्तीचं नाव आहे. चपटे यांच्यावर फायनान्स कंपनीचं कर्ज होतं, या कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीकडून त्यांच्यामागे तगादा लावण्यात आला होता. त्यामुळे हे कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत ते होते. अखेर गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
रेणापूर तालुक्यातील सावकारी प्रकरणातून हत्या झालेले तपघाले प्रकरण राज्यभर गाजले असतानाच, आता याच तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. पंढरी शिवाजी चपटे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. चपटे हे तालुक्यातील बावची येथील रहिवासी होते. त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं, या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
फायनान्स कंपनीचा तगादा  
पंढरी चपटे यांच्यावर कर्ज होते,  या कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीकडून त्यांच्यामागे तगादा लावण्यात आला होता. या तगाद्याला कंटाळून अखेर चपटे यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचा तगादा; शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement