advertisement

Latur Lok Sabha Result 2024 : लातूरमध्ये पुन्हा कमळ फुलणार की पंजा कमाल करणार?

Last Updated:

राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. या मतदारसंघात दिग्गजांच्या प्रचार सभा झाल्यानं निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

News18
News18
लातूर, नितीन बनसोडे, प्रतिनिधी : राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. एकूणच लोकसभा मतदार संघात प्रचाराचा आढावा घेतला असता मतदार संघात भाजपच्या वतीने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांदा मैदानात उतरवण्यात आलं, तर दुसरीकडे काँग्रेसकडून लातुरातले प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली . उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या वतीने प्रचारासाठी गावागावात यंत्रणा उभी करत प्रचार करण्यात आला.
या प्रचारात भाजपच्या वतीने आघाडी घेतल्याचे जाणवले. भाजपच्या वतीने सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी लातूर जिल्ह्यात सभा घेतल्या, आधी चंद्रशेखर बावनकुळे, चित्रा वाघ, विनोद तावडे यांच्या सभा झाल्या त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या, शेवटी नितीन गडकरी यांची देखील सभा झाली. दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारासाठी बाळासाहेब थोरात, सुषमा अंधारे आणि प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
सात मे रोजी लातूर लोकसभा मतदार संघात मतदान झालं, एकूण 62.59 टक्के एवढं मतदान झाले. 2019 साली 62.14 टक्के एवढेच मतदान झाले होते. गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढला, तसेच नवमतदारांनी देखील उत्स्फूर्तपणे आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे या मतदारसंघात निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या पथ्थावर पडणार हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Lok Sabha Result 2024 : लातूरमध्ये पुन्हा कमळ फुलणार की पंजा कमाल करणार?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement