Latur News : जीवापाड जपलेल्या एक एकर कोथिंबीरवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर; पाहा Video
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Latur News : उदगीर तालुक्यातल्या कुमठा येथील शेतकरी अतुल केंद्रे यांनी देखील भाव घसरल्याने आपल्या एक एकरावरील कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.
नितिन बनसोडे, प्रतिनिधी
लातूर, 5 ऑगस्ट : एकीकडे टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे कोथिंबीरीला कवडीमोल भाव मिळत आहे. मागच्या महिन्यात कोथिंबीरला चांगला भाव होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता. मात्र, काही दिवसांपासून कोथिंबिरीला लागवड आणि वाहतुकीचा खर्च निघेल इतकाही भाव मिळत नाही. कोथिंबीरच्या कॅरेटला सध्या पन्नास रुपये इतका भाव मिळतोय, त्यामुळे कोथिंबीर बाजारात नेण्यापेक्षा काढून टाकलेली बरी असा विचार शेतकरी करीत आहेत. अशातच एका संतापलेल्या शेतकऱ्याने आपल्या शेतातील कोथिंबीरीव रोटा फिरवला.
advertisement
काय आहे प्रकरण?
सध्या टोमॅटो व हिरवी मिरचीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडले असून रोजच्या आहारात लागणाऱ्या कोथिंबीरचे भाव पडला आहे. कोथिंबीरला बाजारात कवडीमोल किंमत असल्याने उदगीर तालुक्यातील कुमठा खुर्द येथील शेतकरी अतुल केंद्रे यांनी त्यांच्या शेतात ट्रॅक्टर फिरवला. बाजारात कोथिंबीरचा दर घसरल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांने शेतातील कोथिंबीरीवर नांगर फिरविला. शेतकरी अतुल केंद्रे यांनी देखील भाव घसरल्याने आपल्या एक एकरावरील कोथिंबिरीवर ट्रॅक्टर फिरवला आहे.
advertisement
Latur News : जीवापाड जपलेल्या एक एकर कोथिंबीरवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर pic.twitter.com/jqiya9T5ji
— News18Lokmat (@News18lokmat) August 5, 2023
टोमॅटोचे दर थेट 300 पार जाण्याची शक्यता
गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने ते आपल्या जेवणातून दूर गेले आहेत. जूनपर्यंत जे टोमॅटो किलोने विकत घेतले जात होते, ते आता ग्रॅमपर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. मे महिन्यात 15 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज 250 ते 280 रुपये किलोने विकला जात असल्याची परिस्थिती आहे. पण येत्या काही दिवसांत टोमॅटोचे दर आणखी वाढणार आहेत. टोमॅटोचा भाव 300 रुपये किलोच्या पुढे जाणार आहे.
advertisement
टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा भाव 300 रुपये किलोच्या पुढे जाणार आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव 300 रुपये किलोपर्यंत जाण्याची भीती घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आवक कमी असल्याने टोमॅटोच्या घाऊक दरात वाढ होऊन त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरही होणार असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टोमॅटोचे किरकोळ भाव वाढू शकतात.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Aug 05, 2023 11:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : जीवापाड जपलेल्या एक एकर कोथिंबीरवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर; पाहा Video







