बैल नसल्यानं शेतकरी आजी-आजोबांनी स्वत:ला जुंपलं, अभिनेता सोनं सूदकडून मदतीचा हात, Local18 च्या बातमीची दखल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
शेतीच्या नांगरणीसाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःच वखर ओढतानाचा वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी देखील या दाम्पत्याला बैल जोडी देण्याचे वचन दिले आहे.
जालना: शेतीच्या नांगरणीसाठी पैसे नाहीत म्हणून स्वतःच वखर ओढतानाचा वृद्ध दाम्पत्याचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. राज्याचे कृषिमंत्री सहकार मंत्री यांनी दूरध्वनीवरून या वृद्ध दाम्पत्याशी संवाद साधला आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. यानंतर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी देखील या दाम्पत्याला बैल जोडी देण्याचे वचन दिले आहे. लोकल 18 ने पवार दाम्पत्याची व्यथा महाराष्ट्राला दाखवल्यानंतर या दाम्पत्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अंबादास पवार यांना कॉल केल्यानंतर त्यांची प्राथमिक चौकशी केली. त्यांच्यावर किती कर्ज आहे, त्यांच्यावर ही वेळ का आली याबाबत विचारणा केली. तेव्हा पवार यांनी आपल्यावर चाळीस हजार रुपये कर्ज असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शेतीमधून फारसे उत्पन्न निघत नाही, मजुरीचे दर फार वाढले आहेत, त्यामुळे बैलजोडी घेणे परवडत नाही आणि ट्रॅक्टर लावून नांगरणीसाठी पैसे अधिकचे द्यावे लागतात, त्यामुळे आपण स्वतः शेताची मशागत करत असल्याचे सांगितले.
advertisement
यानंतर कृषिमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला तुम्हाला आमच्याकडून काय मदतीची अपेक्षा आहे असे विचारले. तेव्हा अंबादास पवार यांनी आमचे कर्ज माफ करावे, शेतीच्या मशागतीसाठी मदत करावी आणि शेती करण्यासाठी खत बी बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांनी आपण तुमच्याकडे कृषी अधिकाऱ्याला पाठवतो तो तुम्हाला आवश्यक ती सर्व मदत करेल असे आश्वासन दिले.
advertisement
त्याचबरोबर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांनी देखील या दाम्पत्याला मदत करण्याची वचनबद्धता दर्शवली आहे. या दाम्पत्याचा नंबर पाठवा आपण यांच्यासाठी बैल जोडीची व्यवस्था करू असे त्याने ट्विटर वरून सांगितले आहे. एकंदरीत लोकल 18 ने या दाम्पत्याची व्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवल्यानंतर पवार दाम्पत्याला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
Location :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
July 03, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/लातूर/
बैल नसल्यानं शेतकरी आजी-आजोबांनी स्वत:ला जुंपलं, अभिनेता सोनं सूदकडून मदतीचा हात, Local18 च्या बातमीची दखल