पवार उद्या विधानभवनही नावावर करतील, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राजकीय विरोधकांकडून सातत्यानं पवारांना लक्ष्य केलं जातंय, त्याचवेळी आता लक्ष्मण हाकेंनीही त्यांच्या जुन्या स्टाईलनं पवारांना टार्गेट केलंय.
शरद जाधव, प्रतिनिधी, मुंबई: पार्थ पवारांच्या कोरेगाव पार्कमधील जमीनीचा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनीही पार्थ आणि अजित पवारांना लक्ष्य केलंय.
पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं सरकारी जमिनीचा परस्पर व्यवहार केल्यानं, राज्यातील राजकारण ढवळून निघतंय.. या व्यवहारात कायद्याची मोडतोड उघड झाल्यानंतर आणि सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय अजित पवारांनी जाहीर केला.. पण, पार्थ पवारांच्या माघारीनंतरही त्यांच्या मागे लागलेलं अडचणींचं शुक्लकाष्ट काही संपत नाहीय. राजकीय विरोधकांकडून सातत्यानं पवारांना लक्ष्य केलं जातंय, त्याचवेळी आता लक्ष्मण हाकेंनीही त्यांच्या जुन्या स्टाईलनं पवारांना टार्गेट केलंय.
advertisement
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. जमिनीच्या सातबाऱ्यावर 'मुंबई सरकार' तसेच ‘महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग’ व ईतर तत्सम शासकीय उल्लेख असतानाही पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनी च्या नावावर केली. उद्या हे पवार महाराष्ट्राचे विधानभवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत असा हल्लाबोल केलाय.
लक्ष्मण हाकेंसह विरोधकांकडून टीकेची झोड उठत असतानाही रविवारी पुन्हा एकदा अजित पवार माध्यमांसमोर आलेय. कोरेगाव जमीन खरेदीप्रकरणात पुन्हा स्पष्टीकरण देत, अजित पवारांनी मुलाची बाजू घेत सारसारवा केली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोप फेटाळून लावले. तसंच चौकशीत सर्व समोर येईल असं म्हणत, टीकाकारांना वेट अँड वॉचचा सल्ला देऊन टाकला. निवडणुका आल्या की असे आरोप होतात, चौकशीतून सगळं समोर येईल, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
कोरेगावमधील 40 एकर जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून शितल तेजवानीचा डोळा असल्याचं उघड झालंय. आधी एकनाथ खडसे आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात या दोन्ही माजी महसूलमंत्र्यांनी ही जागा बळकावण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केलाय.. त्यामुळं शीतल तेजवानी आणि पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचं काय आणि किती जुनं कनेक्शन आहे ? हे देखील समोर येणं गरजेचं आहे. त्यासाठी याप्रकरणी चौकशी पारदर्शक आणि वेगानं व्हायला हवी.. तरंच कोरेगाव पार्कमधील जमिनीचा हा वाद मिटेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 8:02 PM IST


