Farmers News: "हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची अपेक्षा..." शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Farmers Demand From The Government: राज्य सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज नुकतंच जाहीर केलाय. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हे पैसे मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं की आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
जालनाः राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारने 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज नुकतंच जाहीर केलाय. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या या जखमावर फुंकर घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हे पैसे मिळतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं की आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहूया
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आमचं संपूर्ण नुकसान तर भरून निघणार नाही परंतु यामुळे काहीसा दिलासा नक्कीच मिळेल अशी भावना गोपाल खरात या युवा शेतकऱ्याने बोलून दाखवली. सरकार हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची आम्हाला अपेक्षा आहे. कारण आमचा तेवढा खर्च झाला आहे. आमचं हाता तोंडाशी आलेलं पीक वाया गेला आहे. त्यामुळे सरकारकडून जास्तीच्या मदतीची अपेक्षा होती.
advertisement
परंतु सरकारने फुलला फुलाची पाकळी आमच्या पदरात टाकली आहे. त्यामुळे आम्ही सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे समाधानी असल्याचं लक्ष्मण खरात या शेतकऱ्याने सांगितलं. दरम्यान राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टर दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार रुपये फळबागेसाठी 32 हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी 27 हजार पाचशे तर कोरडवाहू पिकांसाठी 18500 एवढ्या मदतीची घोषणा केली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 07, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Farmers News: "हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची अपेक्षा..." शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी