Loksabha Security Breach : 'माझं लेकरू सुखरूप घरी पोहोचवा', अमोल शिंदेची आई ढसाढसा रडली, Video
- Published by:Shreyas
Last Updated:
संसदेत घुसखोरी करून स्मोक कॅण्डल पेटवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या लातूरचा अमोल शिंदे आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, यानंतर अमोल शिंदे याच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत.
नितीन बनसोडे, प्रतिनिधी
लातूर, 14 डिसेंबर : संसदेत घुसखोरी करून स्मोक कॅन्डल पेटवल्याप्रकरणी चार जणांना दिल्लीत अटक करण्यात आली. या चौघांमधल्या दोन जणांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि स्मोक कॅन्डल पेटवल्या, तर दोन जणांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. याप्रकरणी अटक झालेला एक जण महाराष्ट्राच्या लातूरचा आहे. अमोल शिंदे असं लोकसभेत गोंधळ घातलेल्या तरुणाचं नाव आहे. अमोल शिंदे हा लातूरच्या झरी गावचा रहिवासी आहे. अमोल शिंदे याच्या सुटकेसाठी त्याच्या आईने टाहो फोडला आहे. माझं लेकरू सुखरूप घरी पोहोचवा, अशी मागणी अमोल शिंदेच्या आईने केली आहे. अमोलच्या आईला अश्रू अनावर झाले.
advertisement
‘माझं काम आहे जातो म्हणाला. भरतीची त्याला आवड होती, झाली नाही त्यामुळे नाराज झाला होता. मग पोलीस भरती तरी बघतो, काही तरी करतो म्हणून गेला. गुन्हा कशाने केला, नोकरीच्या त्यागाने केला, कशाने केला, सगळी कागदपत्र पोलीस घेऊन गेले. सरकारने आम्हाला आमचं लेकरू माझ्यापर्यंत पोहोचवावं’, अशी भावना अमोलच्या आईने व्यक्त केली.
advertisement
‘रोज व्यायामाला जायचा, पहिलीपासून त्याला रनिंगची आवड होती. लातूरला शिकायचं आहे, महिन्याला 4 हजार रुपये द्या म्हणायचा. आम्हाला जमणार नाही, तुझं शिक्षण झालं आहे, कंपनीमध्ये नोकरी कर सांगितलं. जोवर पोलीस भरतीचं वय आहे, तोपर्यंत हे करू द्या म्हणत होता’, असं अमोलच्या आईने सांगितलं.
अमोल घरातून काय सांगून बाहेर पडला?
‘9 तारखेला दिल्लीला पोलीस भरती आहे म्हणून तो गेला. मिल्ट्रीचं त्याने बघितलं, आसामला गेला होता, त्याचा पहिला नंबर आला होता. पाच हजार मुलांमध्ये तो पहिला आला होता. कॉल येईल म्हणून सांगितलं, पण त्यानंतर लॉकडाऊन लागलं, तर म्हणाला आता माझं मिल्ट्रीमधलं वय संपलं, त्यामुळे दिल्लीत पोलीस भरती आहे, तिथे चाललो म्हणाला. 9 तारखेला त्याने 7 वाजता घर सोडलं. 10 तारखेला मुंबईला आल्यावर त्याने फोन केला, माझं मोबाईलमधलं चार्जिंग संपलं आहे, तुम्हाला चार्जिंग करून परत फोन लावतो म्हणाला. त्यानंतर आम्हाला काही माहिती नाही’, असं अमोलचे वडील म्हणाले.
advertisement
पोलीस घरी आले तेव्हा आम्हाला माहिती झालं. आमचं लेकरू जिवंत आहे का मेलं एवढं सांगा आम्हाला, बाकीचं काही माहिती नाही. आमचा आणि त्याचा संपर्क झाला नाही. तिकडे कोण कोण आहे, याबाबत काहीही माहिती नाही. त्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन लावला आणि माझ्या फोनचं चार्जिंग संपलं सांगितलं. त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. आज थेट पोलीसच घरी आले, त्याची चौकशी केली आणि त्याची कागदपत्र घेऊन गेले’, अशी प्रतिक्रिया अमोलच्या वडिलांनी दिली.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Dec 14, 2023 7:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Security Breach : 'माझं लेकरू सुखरूप घरी पोहोचवा', अमोल शिंदेची आई ढसाढसा रडली, Video







