लोणावळा नगरपरिषदेत भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी लढत, भाजपकडून २२ उमेदवारांची यादी जाहीर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Lonavala Nagar Parishad Election: तळेगावात भाजप राष्ट्रवादीची युती झालेली असली तरी लोणावळ्यात मात्र अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना असणार आहे.
अनिस शेख, प्रतिनिधी, लोणावळा, पुणे : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत यंदा नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे आणि भारतीय जनता पार्टीचे गिरीश कांबळे यांच्यात थेट सामना होणार आहे. दोन्ही पक्षांनी निवडणुकीचे निवडणूक रणशिंग फुंकले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून लोणावळ्यात निवडणुकीच्या रिंगणात 22 उमेदवारांना उतरवण्यात आले आहे.
नगराध्यक्षपदासाठी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येण्याची अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर विकासकामे, पाणीपुरवठा, पर्यटन सुविधा आणि प्रभागनिहाय समस्या या मुद्द्यांवर दोन्ही उमेदवारांकडून जोरदार भूमिका मांडली जाणार असल्याचे संकेत आहेत.
लोणावळा नगरपरिषदेसाठी भारतीय जनता पक्षाकडून २२ उमेदवारांची यादी जाहीर
प्रभाग क्र.१:
शुभांगी गिरीगोसावी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
advertisement
सुधीर पारिंठे (सर्वसाधारण)
प्रभाग क्र.२:
दीपिका इंगुळकर (सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्र.३:
अश्विनी लाड (सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्र.४:
छाया मंगेश आमले (सर्वसाधारण)
प्रभाग क्र.५:
बिंद्रा अनिश गणात्रा (सर्वसाधारण महिला)
सुभाष सुमंत डेनकर (सर्वसाधारण पुरूष)
प्रभाग क्र.६:
रेश्मा अर्जून पठारे (ओबीसी महिला)
दत्तात्रय रामचंद्र येवले (सर्वसाधारण)
प्रभाग क्र.७:
सुरेखा जाधव (सर्वसाधारण महिला)
advertisement
देविदास भाऊसाहेब कडू (सर्वसाधारण ओबीसी)
प्रभाग क्र.८:
जय किशोर घोणे (अनुसूचित जाती)
अनिता सुरेश काळे (सर्वसाधारण महिला)
प्रभाग क्र.९:
अंजली संजय जेधे (अनुसूचित जाती महिला)
आशिष बुटाला (सर्वसाधारण)
प्रभाग क्र.१०:
अश्विनी नंदकुमार जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
शैलेश अनंत गायकवाड (सर्वसाधारण)
प्रभाग क्र. ११:
रचना सिनकर (अनुसूचित जमाती महिला)
शौकत शेख (सर्वसाधारण)
advertisement
प्रभाग क्र.१२:
विजया वाळंज (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
अभय अशोक पारख (सर्वसाधारण)
view commentsLocation :
Lonavala (Lonavla),Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लोणावळा नगरपरिषदेत भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी लढत, भाजपकडून २२ उमेदवारांची यादी जाहीर


