advertisement

Maharashtra Rain : परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार!कोकण,मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा,मुंबईसह ‘ही’ शहरे रेड अलर्टवर

Last Updated:

कोकण,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबत मुंबईसह अनेक शहराने रेड अलर्ट देण्यात आला आहेत.तसेच पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन केंद्राने केले आहे.

Maharashtra Rain
Maharashtra Rain
Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सूरूवात झाली आहे. हा परतीचा पाऊस जाता जाता धुमाकुळ घालणार आहे. कारण कोकण,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबत मुंबईसह अनेक शहराने रेड अलर्ट देण्यात आला आहेत.तसेच पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन केंद्राने केले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोका असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने सांगितले आहे.

सतर्कतेचा सूचना

घाट परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच Flash Flood चा धोका निर्माण होऊ शकतो. नद्यांच्या प्रवाहावर सतत लक्ष ठेवून आवश्यक कार्यवाही करावी.
advertisement
सर्व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावे.
सखल भागात पाणी उपसा पंप तैनात करणे. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या भागांचे निरीक्षण ठेवून आवश्यक कार्यवाही करावी. धोकादायक आणि जुन्ह्या इमारतीवर CSSR च्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना कराव्यात.
वीज व रस्ते पायाभूत सुविधा: दुरुस्ती पथक, साखळी आरें व फिडर संरक्षण युनिट तैनात करावे.
धरन निरीक्षण: कोकण व वरच्या खोऱ्यातील मध्यम धरनांसाठी दररोज आदळवा घेण्यात यावा.
advertisement
जनतेसाठी माहिती प्रसार: आपत्ती पूर्व सूचना SMS, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येत असून, त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहावे.
जिल्हा व संपर्क क्रमांक
१. धाराशिव - ०२४७२-२२७३०१ २. सोलापूर - ०२१७-२७३१०१२
३. बीड - ०२४४२-२९९२९९ ४. अहिल्यानगर - ०२४१-२३२३८४४
५. परभणी - ०२४५२-२२६४०० ६. नांदेड - ०२४६२-२३५०७७
७. लातूर - ०२३८२ २२०२०१ ८. रायगड - ८६५७७५२४६३
advertisement
९. रत्नागिरी - ७०५७२२२३३३ १०. पालघर- ०२५२५ २९६०७४
११. सिंधुदुर्ग- ०२३६२ २२८८४७ १२. ठाणे- ९७६७३३८८२७
१३. पुणे - ९३७१०९६००६१ १४. सातारा- ०२१६२ २३२३४९
१५. मुंबई शहर आणि उपनगर- ९९६७ ०२२ ६९४०३३४४.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Rain : परतीचा पाऊस धुमाकुळ घालणार!कोकण,मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा,मुंबईसह ‘ही’ शहरे रेड अलर्टवर
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement