advertisement

Exit Poll : ठाकरे की शिंदे...विधानसभेत कोण सर्वांधिक जागा जिंकणार? नवीन एक्झिट पोलचा अंदाज काय?

Last Updated:

ॲक्सिक माय इंडियाचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये ठाकरे की शिंदे कुणाची शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणार? महाराष्ट्रातील जनतेने कोणत्या शिवसेनेला पसंती दिली आहे? हे जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे
Axis My India Exit Poll 2024 : विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. आता 23 नोव्हेंबरला येणाऱ्या निकालाची सर्वांना प्रतिक्षा लागली आहे. तत्पुर्वी ॲक्सिक माय इंडियाचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये ठाकरे की शिंदे कुणाची शिवसेना सर्वाधिक जागा जिंकणार? महाराष्ट्रातील जनतेने कोणत्या शिवसेनेला पसंती दिली आहे? हे जाणून घेऊयात.
ॲक्सिक माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा शिवसेना युबीटी गट 26 ते 32 जागा जिंकण्याचा अंदाज आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 53-58 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ॲक्सिक माय इंडियाच्या पोलनुसार शिंदेंच्या नेतृत्वाची ताकद वाढताना दिसते.
शिवसेनेते बंडखोरी झाल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडी जिंकली होती. यामध्ये सर्वांधिक जागा जिंकण्यात ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते.ठाकरेंनी 9 जागा जिंकल्या होत्या.तर शिंदेंच शिवसेना 7 जागा जिंकून पाचव्या क्रमांकावर होती. त्यामुळे शिंदेंना आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची विधानसभा निवडणुकीत संधी होती. त्यानुसार विधानसभेत एक्झिट पोलनुसार शिंदे आपलं नेतृत्व सिद्ध करताना दिसतायत.
advertisement
तसेच ॲक्सिक माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुती बहुमताचा आकडा गाठताना दिसतेय. महायुतीला 178-200 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 82-102 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Exit Poll : ठाकरे की शिंदे...विधानसभेत कोण सर्वांधिक जागा जिंकणार? नवीन एक्झिट पोलचा अंदाज काय?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement