उद्धव यांची बॅग आज पुन्हा तपासली; ठाकरेंचा प्रतिप्रश्न, आजही मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
लातूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Bag Checking) यांच्या बॅग तपासणीवरून राजरकारण तापले असताना आज पुन्हा औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे. औसा येथील हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी करण्यात आली आहे.पंतपधान मोदी नरेंद्र मोदी आज दौऱ्यावर आहेत त्यांच्या बॅगांची तपासणी झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.उद्धव ठाकरेंसोबत, मिलिंद नार्वेकरांच्या देखील बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनी बॅग तपासणी करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. तुमचे नाव काय? तुमचे आय कार्ड दाखवा?, तुमच्या पाकिटात किती पैसे आहेत? आतापर्यंत किती जणांच्या बँगा तपासल्या? यावर अधिकाऱ्यांनी तुमची सभा पहिली असल्याने तुमची तपासत आहे असे उत्तर दिले. त्यावर उद्धव ठाकरेंनी मीच तुम्हाला पहिला गिऱ्हाईक सापडतो का? असा मिश्किल प्रश्न विचारला. आज मोदी सोलापुरात आहे तर तिकडे विमानतळ बंद आहे. आज त्यांची पण तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे औसा मतदारसंघातील उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी आले असता निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ स्वत: उद्धव ठाकरेंनी शुट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांची गाडी कालही अडवली होती
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला असताना यवतमाळच्या वणीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनीसोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगा तपासल्या.या प्रकारावर उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. स्वत: उद्धव ठाकरे यांनी या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर काढून अधिकाऱ्यांना बोचरे सवाल केले.
महाविकास आघाडीचे वणी विधानसभेचे अधिकृत उमेदवार संजय देरकर ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेत सत्ताधारी महायुतीसह केंद्र शासनावरही उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. याच सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याचा प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
Nov 12, 2024 3:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव यांची बॅग आज पुन्हा तपासली; ठाकरेंचा प्रतिप्रश्न, आजही मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो?









