Maharashtra Band : 'महाराष्ट्र बंद' होणार का नाही? कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Shreyas
Last Updated:
बदलापूरच्या शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर महाविकासआघाडीने शनिवारी बंदचं आवाहन केलं होतं. पण मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.
मुंबई : बदलापूरच्या शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर महाविकासआघाडीने शनिवारी बंदचं आवाहन केलं होतं. पण मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. यानंतर शरद पवार आणि काँग्रेसने या बंदमधून माघार घेतली. आता उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरेंनीही माघार घेतली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'उद्याचा बंद विकृतीविरुद्ध होता. उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली. एका गोष्टीचं बर वाटलं, न्यायालय इतक्या तत्परतेने हालू शकतं हे कौतुकास्पद आहे. ज्या तत्परतेने हा निर्णय दिला, तशीच तत्परता गुन्हे आणि गुन्ह्यातील आरोपींबाबत दाखवून त्यांना शिक्षा देण्याची तत्परता दाखवावी', असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
'उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नाही, पण कोर्टाचा आदर ठेवावा लागतो. या बंदच कारण वेगळं होतं. सुप्रीम कोर्टात जायची ही वेळ नाही. जनतेचा संताप उफाळला तर आणखी कठीण होईल. उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत, पण राज्यभर प्रत्येक चौकात महाविकासआघाडीचे नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळी फिती आणि काळे झेंडे घेऊन निषेध करतील', असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
advertisement
'बंदला तुम्ही बंद म्हणलात आम्ही तोंड बंद ठेवतो. लोकशाही मानणार्या देशात फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ही गोष्ट शिल्लक आहे का नाही? मोर्चे संप यालाही बंदी केली आहे का? लोकांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत का? मी 11 वाजता शिवेसना भवनच्या चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन बसणार आहे', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 23, 2024 7:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Band : 'महाराष्ट्र बंद' होणार का नाही? कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं







