Maharashtra Cabinet Decision: मुंबई आणि म्हाडासंदर्भात दूरगामी निर्णय, कॅबिनेट बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने ५ महत्त्वाचे निर्णय घेतले.
मुंबई : भाजपमधल्या इनकमिंगवर शिवसेना मंत्री नाराज असताना आणि बड्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारलेली असताना दुसरीकडे बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य देण्यात आले. बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बैठकीत नगर विकास विभाग, विधि व न्याय विभाग, गृहनिर्माण विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महिला व बाल विकास विभागासंबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ निर्णय
१) (नगर विकास विभाग)
राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठी धोरण जाहीर. सिडकोसह, अन्य प्राधिकरणांना संबंधित संकल्पनांवर आधारित एकात्मिक वसाहती निर्माण करण्याकरिता अधिकार मिळणार. निवासी एकात्मिक वसाहत किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होणार. सिडकोसह, विविध प्राधिकऱणांकडील लॅँड बँकेचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी धोरण
advertisement
२) (गृहनिर्माण विभाग)
बृहन्मुंबई उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास करण्याबाबतचे धोरण निश्चित. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार
३) (मदत व पुनर्वसन विभाग)
भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती. यामुळे भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ६४ अन्वये दाखल असलेल्या प्रलंबित प्रकऱणांचा जलदगतीने निपटारा होणार
advertisement
४) (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता ३३९ पदांची निर्मिती. शिक्षकांची २३२ आणि शिक्षकेतर १०७ पदांना मान्यता
५) (महिला व बाल विकास विभाग)
महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधि व न्याय विभागाने केलेल्या शिफारशींनुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम, १९५९ या अधिनियमातील कलम ९ व कलम २६ मधील महारोगाने पिडीत, कुष्ठरोगी, कुष्ठालये असे शब्द वगळणार
advertisement
६) (विधि व न्याय विभाग)
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मान्यता
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet Decision: मुंबई आणि म्हाडासंदर्भात दूरगामी निर्णय, कॅबिनेट बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय


