Election Commission Voter List: मतदारयादीच्या घोळावरून विरोधकांकडून 'मोर्चे'बांधणी, निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Election Commission Voter List: विरोधी पक्षांनी येत्या एक नोव्हेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे आता राज्य निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर आले आहे.

मतदारयादीच्या घोळावरून विरोधकांकडून 'मोर्चे'बांधणी, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
मतदारयादीच्या घोळावरून विरोधकांकडून 'मोर्चे'बांधणी, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
मुंबई: मतदारयादीच्या घोळावरून राज्यातील विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. मतदार यादीतील घोळ, बोगस मतदारांविरोधात राज्यातील विरोधी पक्षांनी येत्या एक नोव्हेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे आता राज्य निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी, सर्व जिल्हा प्रशासन, निवडणूक अधिकारी आणि संबंधित स्थानिक संस्थांना महत्त्वाचे निर्देश जारी केले. आयोगाने मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावे ओळखून त्यांची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदार यादीच वापरली जाते. मात्र, ही यादी स्थानिक स्तरावर प्रभाग, पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद निवडणूक विभागांप्रमाणे विभागली जाते. विभाजन करताना मतदारांची नावे, पत्ते आणि क्रमांक हे मूळ यादीप्रमाणेच कायम ठेवले जातात.
advertisement

>>दुबार मतदारांच्या नावासमोर विशेष चिन्ह...

आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांसमोर (**) हे विशेष चिन्ह दाखवले जाईल. अशा मतदारांची स्थानिक स्तरावर तपासणी करून ती एकाच व्यक्तीची आहेत की वेगवेगळ्या व्यक्तींची, याची खात्री करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यान मतदाराचे नाव, लिंग, पत्ता आणि छायाचित्र यांतील साम्य तपासले जाणार आहे.
advertisement
जर मतदाराचे नाव दोन ठिकाणी आढळले, तर त्याने तो नेमक्या कोणत्या प्रभागातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे याबाबत अधिकृत अर्ज भरावा लागेल. त्यानंतर त्याला फक्त त्या एकाच केंद्रावर मतदानाची परवानगी असेल.
याशिवाय, संभाव्य दुबार नाव असलेल्या मतदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास, तो मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केलेले नाही आणि करणार नाही याबाबत हमीपत्र घेतले जाईल. त्याची ओळख पटल्याशिवाय मतदानाची मुभा दिली जाणार नाही, असा आयोगाचा स्पष्ट आदेश आहे.
advertisement
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्देशांमुळे आगामी महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मतदार यादीतील त्रुटी टाळण्यास आणि निवडणुकीची पारदर्शकता वाढविण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Election Commission Voter List: मतदारयादीच्या घोळावरून विरोधकांकडून 'मोर्चे'बांधणी, निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement