Exclusive : शिंदेंवर दबाव वाढला? मुख्यमंत्री पदाबाबत RSS ने भूमिका मांडली; 'ज्यांचे जास्त आमदार...'

Last Updated:

Maharashtra Mahayuti Government Formation News : आरएसएसच्या विचार विमर्ष विभागाचे अनिल संभारे यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली आहे.यावेळी बोलताना आरएसएसने मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Maharashtra Mahayuti Government Formation News : नागपूर : मुख्यमंत्रीपदावरून सध्या महायुतीत रस्सीखेच सूरू आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे प्रमुख दावेदार आहेत. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आग्रही आहेत.अशात दोन्ही नेत्यांकडून दबावतंत्र वापरलं जातंय. त्यात आता मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची उंची अधिक वाढली असती, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) व्यक्त केले आहे. त्यामुळे आरएसएसच्या भुमिकेने एकनाथ शिंदेंवरचा दबाव वाढला आहे.
आरएसएसच्या विचार विमर्ष विभागाचे अनिल संभारे यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली आहे.यावेळी बोलताना आरएसएसने मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका मांडली आहे. ज्यांचे जास्त आमदार त्यांना मुख्यमंत्री करावं ही लोकांच्या मनातील भावना आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावेळी अधिकार नसताना तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यामुळे यावेळेस एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री देण्याबाबत बोलले असते तर त्यांची उंची अधिक वाढली असती, असे अनिल संभारे यांनी म्हटले आहे.
advertisement
कटेंगे तो बटेंगे एक है तो सेफ है या नाऱ्यामुळे हिंदू विचारांना आवाज मिळाला हिंदूंच्या मनातील भावना जागृत झाल्यानं हिंदू समाजाला बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे देखील अनिल संभारे यांनी सांगितले.तसेच हिंदू समाज जागृत झाल्यानंतर त्यांची वाट मोकळी करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलं आहे. लाडकी बहीण आणि सरकारच्या योजना यामुळे देखील मतदार बाहेर निघाले आणि म्हणून अकल्पित अभूतपूर्व यश हिंदू विचारधारेच्या नेतृत्वाला मिळाल आहे.
advertisement
तसेच भाजप संघावर अवलंबून आहे असं दाखवून देण्याचा कुठलाही प्रयत्न नाही लोकसभा निवडणुकीत भाजपने संघटनात्मक ताकद वापरली नाही त्याचा परिणाम त्यांना लोकसभेत दिसला. संघ नेहमी संघटनात्मक नियोजनावर भर देतो त्याकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला असतो. दुर्लक्ष केलं तर त्याचा फटका बसतो आणि तो लोकसभेत बसला विधानसभेत संघटनात्मक काम झालं त्यामुळे भाजपला चांगला यश मिळालं,असे देखील अनिल संभारे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Exclusive : शिंदेंवर दबाव वाढला? मुख्यमंत्री पदाबाबत RSS ने भूमिका मांडली; 'ज्यांचे जास्त आमदार...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement