MHADA Diwali Bonus : म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती रक्कम येणार? पाहूनच घ्या...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
MHADA Diwali Bonus : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात 'म्हाडा'च्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनसची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ 'म्हाडा'नेही कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली.
दसरा- दिवाळीच्या या दिवसांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येकालाच पगारात काही रुपये वाढवून येण्याची अपेक्षा असते आणि हाच क्षण असतो तो 'दिवाळी बोनस'चा... सध्या याच बोनसच्या 'गुड न्यूज'ने म्हाडा कर्मचारी आनंदात आहेत. कारण, दिवाळीच्या साधारण एका महिन्याच्या आधीच्याच पगारामध्ये केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात देण्यासाठी एका मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थात 'म्हाडा'च्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनसची घोषणा करण्यात आली आहे. म्हाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना 25000 रुपये दिवाळीचा बोनस (Diwali 2025) जाहीर केला आहे. 2024 मध्ये अर्थात गेल्या वर्षी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 23000 रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा मात्र, कर्मचाऱ्यांना 2,000 रुपयांनी दिवाळी बोनसमध्ये वाढ करून त्यांना देण्यात येणार आहे.
advertisement
दिवाळी सण जेमतेम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. दरवर्षी प्रमाणे, यंदाही म्हाडा कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. म्हाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, दिवाळी बोनसचा प्रस्ताव म्हाडाच्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडला होता. अधिकाऱ्यांनी चर्चेनंतर हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला. निर्णयामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
September 25, 2025 9:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MHADA Diwali Bonus : म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती रक्कम येणार? पाहूनच घ्या...