गुगलवर Idiot सर्च केलं तर डोनाल्ड ट्रंपचा फोटो का येतो? CEO सुंदर पिचाईंनी सांगितलं यामागचं कारण, Video जोरदार व्हायरल

Last Updated:

या सगळ्यात एक गोष्ट कॉन्ट्रोवर्शिअल ठरली. ती म्हणजे डोनाल्ड ट्रंप आणि इडियट.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : आपण गुगलवर कधी काही सर्च केलं किंवा गुगलला विचारलं तर तो लगेचच आपल्याला आपल्याला हवंय त्याच्याशी तंतोतंत जुळणारे फोटो, व्हिडीओ, माहिती, आर्टिकल देतो. त्यामुळे आपल्याला गोष्टी शोधणं कठिण जातं. ही सगळी किमया आधुनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाची आहे.
पण या सगळ्यात एक गोष्ट कॉन्ट्रोवर्शिअल ठरली. ती म्हणजे डोनाल्ड ट्रंप आणि इडियट.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण असं क्लेम केलं जात आहे की तुम्ही गुगलवर इमेज सेक्शनमध्ये जर Idiot हा शब्द सर्च केला तर सर्वात आधी डोनाल्ड ट्रंप यांचा फोटो दिसतो आणि हे खूप शॉकिंग आहे. याचं गांभिर्य लक्षात घेता गुगलचे सुंदर पिचाइ यांना या प्रकाराबद्दल विचारणा देखील करण्यात आहे.
advertisement
तेव्हा त्यांनी काय आणि कसं घडलं? गुगल कसं काम करतं? याबद्दल सांगितलं आहे आणि यासंबंधीत त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे, जो सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. भारतात हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.
आता काय घडलं, कसं घडलं? सुंदर पिचाइ काय म्हणाले चला सविस्तर जाणून घेऊ.
गुगलच्या मागचं तंत्रज्ञान समजून घेतलं तर लक्षात येतं की गुगलचं सर्च इंजिन वेब क्रॉलर्स नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करतं. हे क्रॉलर्स अब्जावधी वेबसाईट्स स्कॅन करून माहिती एका विशाल इंडेक्समध्ये साठवतात. जेव्हा आपण काही शोधतो, तेव्हा गुगलची रँकिंग अल्गोरिदम त्या इंडेक्समधून सर्वात संबंधित माहिती शोधून देतो. या प्रक्रियेत शेकडो घटक महत्त्वाचे ठरतात. जसं की माहिती किती फ्रेश आहे, लोकप्रियता, वापरकर्त्यांचं वर्तन इत्यादी.
advertisement
मात्र, काही वेळा इंटरनेटवरील ट्रेंड चुकीच्या दिशेने गेला तर त्याचा परिणाम अगदी प्रतिष्ठित व्यक्तींनाही भोगावा लागतो. असंच एकदा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घडलं होतं. गुगलवर “idiot” असा शब्द टाइप केला असता ट्रम्प यांचा फोटो टॉप रिझल्टमध्ये दिसू लागला आणि त्यानंतर हा मुद्दा वॉशिंग्टनमध्ये चर्चेचा विषय ठरला.
या घटनेनंतर Google चे CEO सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील हाऊस ज्युडिशियरी कमिटीसमोर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी डेमोक्रॅटिक प्रतिनिधी झो लफग्रेन यांनी विचारलं. “हे कसं घडतं? सर्च रिझल्टमध्ये असं का दिसतं?”
advertisement
त्यावर सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं की गुगल कुठल्याही रिझल्टमध्ये मॅन्युअली बदल करत नाही. अल्गोरिदमचं काम म्हणजे कीवर्डला अब्जावधी पानांशी जुळवणं आणि त्यांना रिलिव्हन्स, फ्रेशनस, लोकप्रियता आणि इतर घटकांच्या आधारे रँक करणं.
झो लफग्रेन यांनी पुढे थोड्या विनोदी शैलीत विचारलं “म्हणजे पडद्यामागे बसून एखादा माणूस ठरवत नाही की वापरकर्त्याला काय दाखवायचं?” त्यावर पिचाई म्हणाले “मागील वर्षभरात आम्हाला ३ ट्रिलियनपेक्षा जास्त सर्चेस आले होते. त्यामुळे कोणत्याही एका सर्च रिझल्टमध्ये आम्ही मॅन्युअली हस्तक्षेप करत नाही.”
advertisement
ही चौकशी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर झाली होती. ट्रम्प यांनी 2018 मध्ये ट्विट करून गुगलवर “कंझर्व्हेटिव्ह व्हॉईसेस दडपून ‘फेक न्यूज’ला प्राधान्य दिलं जातं” असा आरोप केला होता. मात्र, याला पुरावा सापडलेला नाही.
advertisement
"Google Bombing" म्हणजे काय?
या संपूर्ण प्रक्रियेचा एक मनोरंजक भाग म्हणजे Google Bombing. यात मोठ्या प्रमाणात वापरकर्ते एखादा शब्द किंवा वाक्य एखाद्या खास वेबसाईट किंवा प्रतिमेशी जोडतात. सतत लिंकिंग, शेअरिंग किंवा सर्चिंगमुळे अल्गोरिदमला असं वाटू लागतं की याचं कनेक्शन खरंच महत्त्वाचं आहे आणि मग तो परिणाम सर्चमध्ये वर दिसू लागतो.
advertisement
म्हणजेच, ट्रम्प यांच्या बाबतीत दिसलेलं “idiot” सर्च रिझल्ट हे गुगलचं पक्षपाती धोरण नव्हतं, तर इंटरनेटच्या सामूहिक वर्तनाचा परिणाम होता. BBC च्या मते, हे एकदम क्लासिक “Google Bombing” प्रकरण होतं जिथे अल्गोरिदम इंटरनेट वापरकर्त्यांचा आवाज दाखवतो, तंत्रज्ञान कंपनीचा राजकीय दृष्टिकोन नाही.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
गुगलवर Idiot सर्च केलं तर डोनाल्ड ट्रंपचा फोटो का येतो? CEO सुंदर पिचाईंनी सांगितलं यामागचं कारण, Video जोरदार व्हायरल
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement