'माझं पोरगं थंडीत कुडकुडतंय'! शहीद लेकाच्या पुतळ्याला आईनं दिली मायेची उब, VIDEO पाहून येईल रडू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आईची माया शब्दांपलीकडली! शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडी लागू नये म्हणून माऊलीने पांघरली शाल; चंदीगडमधील 'तो' व्हिडिओ पाहून देश हळहळला
"आई ती आईच असते..." मग लेक डोळ्यांसमोर असो किंवा त्याचा पुतळा, मातेच्या काळजातील ओलावा कधीच कमी होत नाही. याचाच प्रत्यय देणारा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोचऱ्या थंडीत आपल्या शहीद लेकाच्या पुतळ्याला थंडी लागू नये, म्हणून एका माऊलीने त्या पुतळ्यावर मायेचं पांघरूण घातलं. याचा व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पाहणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं.
२१ व्या वर्षी देशासाठी बलिदान
हा व्हिडिओ सीमा सुरक्षा दलाचे (BSF) शहीद जवान गुरनाम सिंह यांच्या आईचा आहे. २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना गुरनाम सिंह यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. अवघ्या २१ व्या वर्षी भारतमातेच्या रक्षणासाठी ते शहीद झाले. त्यांच्या या शौर्याची आठवण म्हणून चंदीगडमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
advertisement
In Jammu, a mother wraps a blanket around her martyred son’s statue to shield it from the cold
Gurnam Singh attained veergati in 2016 while foiling a terrorist infiltration. pic.twitter.com/LX3UcJgxz9
— Megh Updates (@MeghUpdates) January 9, 2026
मायेची शाल अन् ओलावलेले डोळे
सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच आपल्या मुलाला थंडी वाजत असेल, या भावनेने व्याकुळ झालेल्या आईने धावत जाऊन आपल्या शहीद मुलाच्या पुतळ्याला ब्लँकेट आणि शाल पांघरली. पुतळ्याचा चेहरा मायेने कुरवाळताना या माऊलीच्या चेहऱ्यावर जे भाव होते, ते कोणत्याही वीरगाथेपेक्षा मोठे होते. "माझा मुलगा शाहीद झाला तरी तो आजही माझ्यासाठी जिवंतच आहे, असं ही माऊली म्हणते.
advertisement
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटिझन्सनी या माऊलीच्या प्रेमाला आणि शहीद जवानाच्या बलिदानाला सलाम केला आहे. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर करत "शहीद कधीच मरत नाहीत, ते आईच्या हृदयात कायम जिवंत असतात," अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
view commentsLocation :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
Jan 10, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/देश/
'माझं पोरगं थंडीत कुडकुडतंय'! शहीद लेकाच्या पुतळ्याला आईनं दिली मायेची उब, VIDEO पाहून येईल रडू











