Shocking News : मुंबई हादरली! शाळेच्या वॉशरूममध्ये धक्कादायक कांड, आठवीतील विद्यार्थी आरोपी
Last Updated:
Mumbai Shocking News : मुंबईतील एका शाळेत आठवीच्या विद्यार्थ्याकडून वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील मित्रावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
मुंबईत आठवीच्या मुलाचे भयंकर कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका नामांकित शाळेत आठवीत शिकणारा आरोपी विद्यार्थी काही दिवसांपासून आपल्या वर्गमित्राशी अश्लील वर्तन करत होता. यानंतर आरोपीने पीडित मुलाला त्याच्या घराजवळील एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलाने घाबरून बराच काळ कोणालाही काही सांगितले नाही.
advertisement
काही दिवसांपूर्वी पीडित मुलाने ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. हे ऐकताच आईने कोणताही उशीर न करता थेट पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता फेब्रुवारी 2025 मध्ये आरोपी विद्यार्थ्याने पीडित मुलाला मारहाण केल्याचे तसेच शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर बळजबरी केल्याचेही समोर आले आहे.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. तसेच शाळेचे अधिकारी, शिक्षक आणि संबंधित पालकांची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर संबंधित शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शाळांमधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 11:14 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : मुंबई हादरली! शाळेच्या वॉशरूममध्ये धक्कादायक कांड, आठवीतील विद्यार्थी आरोपी











