उद्या 1 वाजता बारावीचा निकाल, इथे पाहा Live Result, जाणून घ्या A to Z माहिती
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Maharashtra HSC Result 2025: उद्या सोमवारी ५ मेला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
Maharashtra HSC 12th Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. उद्या सोमवारी ५ मेला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं होणार?
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात एकूण ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणांसह ग्रेड देखील मिळतील. ग्रेडिंग सिस्टीमनुसार, ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे. ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना प्रथम श्रेणी मिळेल. ४५ टक्के ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्यांना द्वितीय श्रेणी मिळेल. उत्तीर्ण होण्यासाठी ३५ पेक्षा जास्त गुण हवे. ज्या विद्यार्थ्यांना हे किमान गुणही मिळू शकणार नाहीत त्यांना पुन्हा पुरवणी परीक्षेला बसावे लागेल.
advertisement
निकाल पाहण्यासाठीच्या अधिकृत वेबसाइट्सची यादी
1. https://mahresult.nic.in
2. https://mahahsscboard.in
3. https://results.gov.in
4. https://hscresult.mkcl.org
5. https://hsc.mahresults.org.in
बारावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process)
1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. ‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा
3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
advertisement
5. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल. त्यानंतर निकालाची प्रिंट घ्या किंवा PDF सेव्ह करा. मोबाईलवर रिजल्ट पाहत असाल तर स्क्रीनशॉटही काढू शकता
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2025 2:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्या 1 वाजता बारावीचा निकाल, इथे पाहा Live Result, जाणून घ्या A to Z माहिती