10 वी आणि ITI उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती

Last Updated:

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी असून, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या पदांसाठी नोकरभरती केली जात आहे.

10 वी आणि ITI उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती
10 वी आणि ITI उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी असून, इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपाचे एकूण 49 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरामध्ये ही भरती केली जात आहे. महावितरण आर्वी परिमंडळात ही भरती करण्यात येत असून, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अप्रेंटिसशिपच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.apprenticeshipindia.gov.in/ भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी जाहिरातीत दिलेली सविस्तर माहिती (PDF) काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या माहितीची पीडीएफ फाईल बातमीत देण्यात आली आहे.
Mahavitaran Recruitment 2025 Aarvi : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड आर्वी भरती
  • पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा)
  • एकूण रिक्त पदे: 49 पदे
  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन वीजतंत्री, तारतंत्री व कोपा-पासा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (MSBTE) या बोर्डाचा डिप्लोमामार्फत इलेक्ट्रिकशीयन दोन वर्ष अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुद्धा अर्ज करण्याकरिता पात्र समजण्यात येईल.
  • वयोमर्यादा: किमान 18 वर्षे, कमाल 30 वर्षे आणि राखीव उमेदवारांसाठी 5 वर्षांसाठी वयाची अट
  • नोकरीचे ठिकाण: जिल्हा- वर्धा, गाव- आर्वी
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन आणि ऑफलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 05:30 वाजता
advertisement
महावितरण आर्वी विभाग यांच्या कार्यालय क्षेत्रांर्तगत रहिवासी असल्यास उमेदवार अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. तसेच वर्धा जिल्ह्यातील अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांनी ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचुक नमुद करावा. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्ष राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज जाहिरातीच्या दिनांकापासून ते 10.11.2025 पर्यंत कार्यालयाचा आस्थापना क्रमांक E05202702794 यावर योग्य आणि परिपुर्ण माहीतीसह सादर करणे आवश्यक आहे. विहीत मुदतीनंतर सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
advertisement
ऑनलाईन नोंदणी अर्जाची प्रत, शैक्षणिक मुळ कागदपत्रे आणि आधारकार्ड कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., विभागीय कार्यालय, कदम बिल्डींग, वसंत नगर, आर्वी ता. आर्वी जि. वर्धा येथे जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ते अंतिम तारीख पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत अर्ज स्वत: सादर करणे आवश्यक आहे. कार्यालयाला प्राप्त झालेल्या अर्जाचाच विचार करण्यात येईल. शिकाऊ उमेदवारांची निवड माध्यमिक शालांत परिक्षेच्या गुणांची टक्केवारी SSC तसेच आय.टी.आय. गुणांची टक्केवारी याची सरासरी विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करून शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यात येईल.
advertisement
Mahavitaran Wardha Bharti 2025 PDF File: वर्धा महावितरण जाहिरात पीडीएफ फाईल - https://drive.google.com/file/d/
अप्रेंटिसशिप इंडियाची अधिकृत वेबसाईट- https://www.apprenticeshipindia.gov.in/
सरकारी किंवा निमसरकारी क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या आयटीआय आणि दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आत अर्ज दाखल करावा, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी महावितरणच्या वेबसाइटला भेट द्यावी.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
10 वी आणि ITI उत्तीर्ण तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! महावितरणमध्ये विविध पदांसाठी भरती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement