Cabinet Expansion : खातेवाटपाचा तिढा सुटणार? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बंगल्यावर खलबतं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिंदे आणि पवारांच्या आमदारांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज खातेवाटपाचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात आहे.
Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या रविवारी 15 डिसेंबरला पार पडला होता. मात्र या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेलं नाही आहे. त्यात आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, असं असताना खातेवाटप कुठे अडलंय असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शिंदे आणि पवारांच्या आमदारांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज खातेवाटपाचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात आहे.
'हे' नेते रामगिरी बंगल्यावर पोहोचले
उप मुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे रामगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत. भाजपचे मिहिर कोटेचा, चंद्रकात पाटील, आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुमित वानखेडे, अमित साटम बंगल्यावर दाखल झाले आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील देखील रामगिरीवर पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रामगिरीवर पोहचले आहेत.
advertisement
दरम्यान सुरेश धस, चित्रा वाघ आणि निलम गोर्हे, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर , मंदा म्हात्रे , मनिषा चौधरी, दिपक केसरकर, जयकुमार रावल, सत्यजित तांबे हे नेते रामगिरीवरून निघाले आहेत.
आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडून चहापानी नाश्ता करुन आलेलो आहोत.आज खाटेवाटप होईल असं वाटतंय. तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे, असे शिवसेनेचे आमदार भरतशेट गोगावले यांनी सांगितले आहे. तसेच पालकमंत्री काय असेल ते ठरवतील, रायगड पालकमंत्री आमच्या नशिबात असावं असं वाटतंय. त्या वेळेला मी मंत्री नव्हतो आता आहे, आम्ही महायुतीत होतो आणि आमची इच्छा आहे, असे देखील गोगावले यांनी सांगितले. तसेच कोणते खाते मिळणार असं विचारलं असता, ते म्हणाले विभाग आत्ताच नाही सांगत, दुपारनंतर सांगू, असे गोगावले म्हणाले आहेत.
advertisement
अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेंचा प्रवास
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीनंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचं नाव घेतं धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. याच कारणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केलं होतं. त्यात आता गुरूवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.त्यात आता अजित पवार, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 21, 2024 10:27 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Cabinet Expansion : खातेवाटपाचा तिढा सुटणार? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बंगल्यावर खलबतं










