Mumbai Accident : 'आई, उशीर होईल'... असं सांगून गेलेला मुलगा परतलाच नाही; मालाडमध्ये डंम्परच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Last Updated:

Malad Accident : मालाडच्या पठाणवाडी उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीला डम्परने धडक दिल्याने हा अपघात झाला. त्याचा मित्रही जखमी असून पोलिस तपास सुरू आहे.

News18
News18
मुंबई : मालाड परिसरातील शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघाताने संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं आहे. फक्त 22 वर्षांचा निखिल हा आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेला हा उत्साही तरुण एका क्षणात सगळं काही गमावून बसला. नेमकं निखिल बाबतीत काय घडलं ते जाणून घेऊयात
रात्रीच्या जेवणाचं निमित्त ठरलं आयुष्याचा शेवटचा
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल कद्रे हा आरे कॉलनीत कुटुंबियासोबत वास्तव्यास आहे. शनिवारी (तारीख.8)रात्री निखिल त्याच्या मित्रासोबत (सुमित खैरनार) जेवण करण्यासाठी बाहेर पडला होता. पण तो पुन्हा कधीच घरी परतणार नाही, याची कल्पना सुद्धा कुणालाच नव्हती.
दोघही मित्र पश्चिम द्रुतगती मार्गावरील मालाड पठाणवाडी उड्डाणपुलावरुन जात होते. अचानक तिथे डम्परचालकाने अचानक घेतलेल्या वळणामुळे त्यांची दुचाकी थेट डम्परला धडकली आणि काही क्षणांतच सगळं संपलं. अपघात इतका भीषण होता की जवळच्या लोकांनी त्यांना जोगेश्वरीच्या रुग्णालयात दाखल केल, पण डॉक्टरांनी निखिलला मृत घोषित केलं.
advertisement
घडलेल्या या घटनेत निखिलचा मित्र सुमित वाचला आहे. निखिलच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील तरुण मुलगा गमावल्याच्या वेदनेत आईवडील शब्दही उच्चारू शकत नाहीत  तर मित्रपरिवारही हादरला असून सोशल मीडियावर सर्वजण त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
या अपघातानंतर डम्परचालकाच्या ड्रायव्हिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोजच रस्त्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे कित्येक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Accident : 'आई, उशीर होईल'... असं सांगून गेलेला मुलगा परतलाच नाही; मालाडमध्ये डंम्परच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement