Mangesh Kalokhe Case: 'रायगडचा आका..',म्हणत मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शिवसेना आमदाराचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Last Updated:

'पोलिसांनी अजून नीट तपास सुरू केला नाही. तरी सुनील तटकरे हे सुधाकर घारे हा निर्दोष असल्याचं सांगत आहे'

News18
News18
खोपोली: खोपोलीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. 'बीडमध्ये जे घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजीत राजकारण घडत आहे. खऱ्या अर्थाने या प्रकरणात सुनील तटकरे हे आका आहेत. त्यांना सत्येचा माज आहे" असं म्हणत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे.
मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी न्यूज१८ लोकमतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"मंगेश काळोखे यांची रविवारी हत्या झाली. राष्ट्रवादीकडून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. आम्ही सगळे इथं जमलो आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ परंतु, ज्या प्रकारे क्रुरहत्या झाली.  प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चुकीचे वक्तव्य करत आहे. एफआयआरमध्ये सुधाकर घारे याचं नाव आहे. पण, तटकरे हे सुधाकर घारे याला निर्दोष असल्याचं सांगत आहे. कोणत्याही प्रकाराचा तपास झाला नाही. पोलिसांनी अजून नीट तपास सुरू केला नाही. तरी सुनील तटकरे हे सुधाकर घारे हा निर्दोष असल्याचं सांगत आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर यांचा दबाव आहे. सुनील तटकरे फोन करत आहे, असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला.
advertisement
"मंगेश काळोखे यांची प्लॅन करून हत्या केली आहे. रवी देवकर आणि त्यांचं कुटुंब हे मंगेश काळोखेंची हत्या करू शकत नाही. भरत भगत, रवी देवकरचा मित्र आहे. सुधाकर घारे हा त्यांचा जिल्हाप्रमुख आणि लिडर आहे. खोपीलीत सतत राष्ट्रवादीचा पराभव होत आहे. त्यामुळे हे त्यांना पाहावतं नाही, यातून त्यांनी ही हत्या केली आहे. हे संपवण्यासाठी त्यांनी मंगेशची हत्या केली आहे. विधानसभेला सुद्धा मंगेश काळोखे यांनी सगळ्यात जाास्त लिड दिली होती. आता नगरपालिकेला सुद्धा ६०० मतांचा आघाडी मंगेश काळोखे यांनी दिली होती. सुधाकर घारे, भरत भगत आणि रवी देवकर यांना हे असह्य झालं होतं. म्हणून मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या केली आहे, असा आरोपही थोरवेंनी केला.
advertisement
"उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी  मागणी आम्ही केली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे. जर पोलिसांनी दिरंगाई केली तर आम्ही पोलीस स्टेशनला ठिय्या देऊ. वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ. खऱ्या अर्थाने या प्रकरणात सुनील तटकरे हे आका आहेत. बीडमध्ये जे घडलं तेच रायगडमध्ये रक्तरंजीत राजकारण घडत आहे. त्यांना सत्येचा माज आहे' अशी टीकाही थोरवेंनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mangesh Kalokhe Case: 'रायगडचा आका..',म्हणत मंगेश काळोखे हत्या प्रकरणी शिवसेना आमदाराचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement