'शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं', मराठा आंदोलकांनी सु्प्रिया सुळेंना अडवलं; आझाद मैदानात गोंधळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची कार अडवली, तसेच आम्ही गाडी सोडणार नाही, अशा घोषणा देखील केल्या.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर पेटलेल्या आंदोलनात मोठाी अपडेट समोर येत आहे. रविवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेटायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे
यांना आंदोलकांच्या प्रचंड संतापाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन निघाल्यानंतर आंदोलकांनी थेट सुळेंचा गाडीसमवेत घेराव घातला. या प्रसंगी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच सुप्रिया सुळेंच्या कारवर बॉटल देखील फेकल्या. तसेच शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं अशी घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली.
सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्यानंतर गाडीकडे जात असताना शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी "शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं" अशा जोरदार घोषणाबाजी केली. एवढ्यावरच मर्यादित न राहता संतप्त गर्दीने सुळे यांच्या कारला अडवलं. काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्याची माहितीही समोर आली आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
advertisement
आंदोलकांचा उद्रेक झाल्याने मोठा गोंधळ
मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. सुप्रिया सुळेंची कार अडवण्याचा आली. तसेच आम्ही गाडी सोडणार नाही, अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांच्या भावना ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीचा आक्रोश इतका वाढला की संवादाचा प्रयत्नही फसला. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुळे या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर बाहेर पडताच आंदोलकांचा उद्रेक झाल्याने गोंधळ उडाला.
advertisement
परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पवार कुटुंबाविरोधात आंदोलकांची नाराजी उघडपणे रस्त्यावर आली आहे. "शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, आमच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही" असा आरोप आंदोलकांकडून होत आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांची संतप्त भूमिका अधिक तीव्र होत चालली असून पुढील काळात आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सर्वपक्षीय बैठक लवकरात लवकर बोलवा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, सगळ्या पक्षांनी मिळून एकत्र यावर मार्ग काढू, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.दुर्दैव आहे की, तीन दिवस झाले आंदोलन सुरू आहे. सरकारमधून एकही प्रतिनिधी इथे चर्चा करायला आला नाही, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 31, 2025 4:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं', मराठा आंदोलकांनी सु्प्रिया सुळेंना अडवलं; आझाद मैदानात गोंधळ










