धनंजय मुंडेंकडून हत्येचा कट, जरांगेंचा खळबळजनक आरोप, पंकजा मुंडे बावनकुळेंचंही घेतली नावं, काय म्हणाले?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी धनंजय मुंडेचा निकटवर्तीय कांचन याच्या संपर्कात होते, असा आरोप जरांगे यांनी केला. त्यांनी अडीच कोटींची सुपारी दिली, असा खळबळजनक आरोप केला.
यावेळी जरांगे यांनी आमच्याकडे आरोपींचं गुप्त रेकॉर्डिंग आहे, असं म्हणत पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचंही नाव घेतलं आहे. अटक केलेल्या आरोपींना बऱ्याच गोष्टी माहीत आहे. त्यांना सिरीयस घेण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या गाडीमध्ये सीटखाली मोबाईल ठेवण्यात आले आहेत. जीपीएस ट्रॅकर लावले आहेत, असा दावाही त्यांनी केला.
advertisement
"गोपीनाथ मुंडेंनी असं राजकारण नाही केलं. त्यांनी सामाजिक लोकांचं कल्याण केलं. पण हे नीच (धनंजय मुंडेंना उद्देशून) लोकांना मारतंय किंवा डाव करतंय. माझ्या ध्यानात येत नाही, इतकी माहिती माझ्याकडे आहे. आमच्याकडे काही रेकॉर्डिंग्ज आहेत. ते ऐकून आम्ही थकलोय. तरीही रेकॉर्डिंग संपत नाहीत. अटक केलेल्या आरोपींना खूप गोष्टी माहीत आहेत. मी सांगतोय त्या गोष्टी सिरीयस घ्या. पंकजा मुंडेंचा काय विषय आहे? ते त्या पोरांना सगळं माहीत आहे. बावनकुळेंच्या भाच्याबद्दल काय? हे सगळं आरोपींना माहीत आहे. सुरेश धस, कराड यांच्याबद्दलही महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे आहे, असा दावा जरांगे यांनी केला.
advertisement
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघं भाऊ बहीण आहेत, म्हणून मी हे म्हणत नाही. आरोपींनी आम्हाला हे सांगितलं आहे. आम्हाला त्यांनी कराडबद्दल आणि सुरेश धस यांच्याबद्दलही सांगितलं आहे, असं जरांगे म्हणाले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 07, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धनंजय मुंडेंकडून हत्येचा कट, जरांगेंचा खळबळजनक आरोप, पंकजा मुंडे बावनकुळेंचंही घेतली नावं, काय म्हणाले?


