Manoj Jarange Patil : उपोषण सोडणार, मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती? जरांगेच्या निर्णयाकडे लक्ष

Last Updated:

मनोज जरांगे पाटील आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे. जरांगे मराठा समाजाशी संवाद साधून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.

उपोषणाचा नाद सोडणार, मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती? जरांगेच्या निर्णयाकडे लक्ष
उपोषणाचा नाद सोडणार, मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती? जरांगेच्या निर्णयाकडे लक्ष
अंतरवाली, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील आज आपले उपोषण सोडण्याची शक्यता आहे. बुधवारी, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. आम्हाला अपेक्षित नव्हते इतके दिवस आंदोलन करावे लागेल. आम्हाला वाटले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याशी गद्दारी करणार नाही असे वाटत होते. पण फडणवीस हे आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आमच्या आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे आम्हाला कळले असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा आजच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 दिवसांपासून उपोषणासाठी बसले आहेत. जरांगे आज दुपारी उपोषण सोडण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत उपोषण सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता आता उपोषण करणार नसून वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी म्हटले. आता उपोषण थांबवणार असून आरक्षणासाठी वेगळ्या मार्गानं आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. आज मराठा समाजाशी संवाद साधत पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement

जरांगेंकडून सरकारवर टीकास्त्र....

उपोषणाच्या पाचव्या दिवशी बोलताना जरांगे यांनी सरकारवर टीका केली. आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे. तर दगा फटका कराल तर 5 वर्ष तुम्हाला सत्तेत सुखानं राहू देणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात की नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असं आवाहन जरांगेंनी केले होते.
advertisement
जरांगेंच्या उपोषणातील मागण्या काय?
सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा. कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे, सगळ्या सगे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे त्यामुळे मागेपुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत, न्यायमुर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरु करा, आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्या, सातारा-औंध-मुंबई-हैद्राबाद गॅझेट लागू करा तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या, अशा १० मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : उपोषण सोडणार, मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती? जरांगेच्या निर्णयाकडे लक्ष
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement