कुणबी लिहायला लाज कसली वाटते? जातनिहाय जनगणनेवर जरांगे पाटलांचा मराठ्यांना सवाल

Last Updated:

Manoj Jarange Patil: जातनिहाय जनगणनेचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी स्वागत केले आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील
रवी जैस्वाल, जालना: गेली अनेक वर्षे सत्ताधारी पक्षातले काही गट आणि विरोधकांनी लावून धरलेली 'जातनिहाय' जनगणनेची मागणी लक्षात घेऊन बरोबर बिहार निवडणुकीच्या काही महिने आधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र भारतातील पहिली जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मागील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्वच वंचित पीडित घटकातील समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही मोठा फायदा होईल, असे सांगितले जाते.
जातनिहाय जनगणनेचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी स्वागत केले आहे. ओबीसी समाज जास्त आरक्षण घेत होता. जातनिहाय जनगणनेने खरा आकडा समोर येऊन मराठ्यांना आरक्षण मिळेल, आमच्या पोरांचे कल्याण होईल, असे जरांगे पाटील म्हणाले.

कुणबी लिहायला लाज कसली वाटते?

जातनिहाय जनगणनेच्या फॉर्मवर कुणबी लिहायला लाज वाटणार नसल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलीये. त्याचबरोबर मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या अर्जावर कुणबी लिहायला लाज वाटणार नाही. मराठा कुणबी पण लिहू शकता. आपण छत्रिय मराठा आहोत. आपण युद्धकाळात लढाया केल्या आहेत. गेली शेकडो वर्षे शेती करतोय. शेती करणारे कुणबी. मराठे आणि कुणबी एका अर्थी एकच आहेत, ते वेगळे नाहीत. मात्र जनगणनेचा अर्ज आणि त्याचा उद्देश बघितल्यानंतरच मराठा समाजाला आवाहन करीन, असे जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
advertisement

जातनिहाय जनगणनेने नेमकं काय होईल?

जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामुळे सर्व समाज घटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल, अशी भावना सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाजबांधवांच्या विकासासाठी सरकारला अधिक निधी देता येईल. मागास समाज घटकांचा शैक्षणिक, आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य करता येईल, अशा सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुणबी लिहायला लाज कसली वाटते? जातनिहाय जनगणनेवर जरांगे पाटलांचा मराठ्यांना सवाल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement