Manoj Jarange : काल फडणवीसांनी शपथ घेतली, आज जरांगेंनी अल्टिमेटम दिला, मराठा आरक्षणावर काय बोलले?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Manoj Jarange On Devendra Fadnavis : गुर्मीत आणि मस्तीत जगायचं नाही, जनतेनं कौला दिला म्हणून नाटकं नाही करायचे, समाजाला सांभाळायला शिकायचं, अंगावर माणसं नाही घालायचे, अंगावर जायला यायला तुमच्याकडे आहे तसेच प्रत्येकाकडे आहेत असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे.
Manoj Jarange On Devendra Fadnavis : रवी जयस्वाल, जालना : महायुतीचा शपथविधी सोहळा गुरूवारी मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर अधिकृतपणे आता फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असा नवा अल्टिमेटम जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, येत्या 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा नसता पुन्हा आंदोलन उभं करणार असा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहेत.आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणे गरजेचे आहेत.. याआधीही हेच सरकार अस्तित्वात होतं.. त्यामुळं येत्या पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा. नसता पुन्हा आंदोलन उभं करून करून सरकारला परेशान करणार, असे जरांगे यांनी म्हटलं आहे.
advertisement
गुर्मीत आणि मस्तीत जगायचं नाही, जनतेनं कौला दिला म्हणून नाटकं नाही करायचे, समाजाला सांभाळायला शिकायचं, अंगावर माणसं नाही घालायचे, अंगावर जायला यायला तुमच्याकडे आहे तसेच प्रत्येकाकडे आहेत असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. दरम्यान जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया समोर येतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
December 06, 2024 1:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange : काल फडणवीसांनी शपथ घेतली, आज जरांगेंनी अल्टिमेटम दिला, मराठा आरक्षणावर काय बोलले?


