Maratha Reservation Vs OBC Reservation: मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाला विरोध, पण..., ओबीसी नेत्यांची जरांगेंच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया, जरांगेंची धार...
- Reported by:Uday Timande
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
OBC leader On Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनात ताठर भूमिका घेणार्या जरांगेंनी यु टर्न घेतला असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले.
नागपूर: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण आझाद मैदानात सुरू आहे. जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. ओबीसी आरक्षणासाठी नागपूरमध्ये साखळी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात ताठर भूमिका घेणार्या जरांगेंनी यु टर्न घेतला असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटले. मनोज जरांगे यांच्या एका मागणीवर हरकत नसल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वेग आला असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांमध्ये सातत्य न ठेवता यू-टर्न घेतल्याचा दावा तायवाडेंनी केला आहे.
advertisement
डॉ. बबनराव तायवाडे यांनी 'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना म्हटले की, “सुरुवातीला जरांगे सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र आता ते गॅझेटमध्ये ज्यांची नोंद आहे, अशांनाच आरक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत. ही मागणी सुरुवातीच्या भूमिकेपासून पूर्ण वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी झाली असल्याचेही तायवाडेंचे मत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यास आम्ही ठाम विरोध करतो. पण शैक्षणिक किंवा महसूल कागदपत्रांवर कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध नसल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहणे आपल्याला शक्य नसल्याचे तायवाडेंनी सांगितले. “सध्या माझ्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे. त्यामुळे मुंबईला जाता येणार नाही, याची माहिती मी भुजबळांना फोनवरून दिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Sep 01, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation Vs OBC Reservation: मराठ्यांच्या सरसकट आरक्षणाला विरोध, पण..., ओबीसी नेत्यांची जरांगेंच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया, जरांगेंची धार...










