Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोठी अपडेट, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, किती जणांना मिळणार ओबीसी आरक्षण लाभ?

Last Updated:

Maratha Reservation : राज्य सरकारने शिंदे समिती नेमली होती. या समितीने आपला चौथा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि ओबीसी नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

News18
News18
पुणे: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. कुणबी नोंद प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी समुदायातून आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. आता या मागणीला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने शिंदे समिती नेमली होती. या समितीने आपला चौथा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि ओबीसी नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
मराठा-ओबीसी राजकारण पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे समितीने राज्य सरकारकडे चौथा अहवाल सादर केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, 58.82 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नोंदीच्या आधारे जवळपास 8.25 लाख कुणबी प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. या प्रमाणपत्रांच्या आधारे सुमारे 2 कोटी मराठा समाजातील लोकांना ओबीसी कोट्यात आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज आहे.
advertisement

शिंदे समितीचा अहवाल नाकारण्याची मागणी...

या अहवालावर ओबीसी नेते व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारू नये, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील या मुद्द्यावर न्यायालयाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले. काही लोकांनी प्रमाणपत्र देण्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे भुजबळांनी सांगितले.
advertisement
लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट भूमिका घेत राज्य सरकारने अहवाल नाकारावा, अशी मागणी केली. त्यांनी म्हटले, "जर 2 कोटी मराठा समाज ओबीसी कोट्यात आला, तर ओबीसी समुदायावर त्याचा विपरीत परिणाम होईल. इतक्या मोठ्या संख्येतील समावेशामुळे ओबीसी आरक्षणच संपुष्टात येईल. त्यामुळे राज्य सरकारने हा अहवाल नाकारावा, अन्यथा आम्हाला राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोठी अपडेट, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, किती जणांना मिळणार ओबीसी आरक्षण लाभ?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement