Ajit Pawar : मराठी माणसावरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद, अजितदादा कडाडले, अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी...

Last Updated:

उबाठाचे आमदार सुनील प्रभु कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत मांडला. कल्याण येथील रहिवाशी सोसायटीत हिंदी भाषिक अखिलेश शुक्ला एमटीडीसीचे मॅनेजर यांनी मराठी कुटुंबावर हल्ला केला.

Ajit pawar on kalyan
Ajit pawar on kalyan
Ajit Pawar on marathi family beaten kalyan : कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडाकरवी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत. या प्रकरणावर उबाठाचे आमदार सुनील प्रभु यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यावर उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असे म्हणत त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहे.
उबाठाचे आमदार सुनील प्रभु कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत मांडला. कल्याण येथील रहिवाशी सोसायटीत हिंदी भाषिक अखिलेश शुक्ला एमटीडीसीचे मॅनेजर यांनी मराठी कुटुंबावर हल्ला केला. शिव्या घातल्या, बाहेरची लोक आणून मराठी माणसाला मारहाण केल्याच्या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
या घटनेला गांभीर्याने घेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ही माहिती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्यायी हयगय केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यामातून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मानसन्मान ठेवला जाईल, याची खात्री मी देतो, तसेच संबंधित प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने सोसायटी बाहेरील माणसं आणून बिल्डिंगमधील मराठी कुटुंबाला लोखंडी रॉड, पाईप, काठया तसंच लाकडी पट्टयाने मारहाण केली आहे, यात दोन ते तीन जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
कल्याण पश्चिमेत आजमेरा हाईटस् / 1, योगीधाम ही बिल्डिंग आहे. बुधवारी रात्री पावणे आठ वाजता लता बाळकृष्ण कळवीकट्टे (वय 56 वर्षे) यांचे अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गिता शुक्ला यांच्याशी धुप अगरबत्ती लावल्याने आणि धुर झाल्याच्या कारणावरून वाद सुरू होते, त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा लता कळवीकट्टे यांना अपमानीत करत होता, “तुम मराठी गंदे लोग तुम मच्छी मटण खाते हो. झोपडपट्टी में रहो. तुम मराठी निच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डींग में रहने की,” असे शब्द शुक्लाने वापरल्याचा आरोप आहे.
advertisement
हे भांडण सोडवण्यासाठी बाजूलाच राहणारे धीरज देशमुख मध्ये पडले. तुमचे आणि काकुंचे भांडण आहे, ते तुम्ही आपसात मिटवुन घ्या, पण सर्व मराठी लोकांना का अपमानीत करता? असं धीरज देशमुख शुक्लाला म्हणाले. यावर ‘मी मंत्रालयात कामाला आहे, तू मला मराठीचं सांगू नकोस. तुझ्यासारखे 56 मराठी लोक माझ्यासमोर झाडू मारतात. एक मिनिट मे चीफ मिनिस्टर ऑफिससे फोन करूंगा, तो तुम्हारा पुरा मराठीपन निकल जायेगा. आधा घंटा रुर तेरा मर्डर कर देता हूं’, अशी धमकी दिल्याचा आरोप धीरज देशमुख यांनी केला आहे.
advertisement
हा सर्व प्रकार होत असताना धीरज यांचा भाऊ अभिजित हा तेथे आला. त्यावेळेस अखिलेश याची पत्नी गिता शुक्ला भाऊ अभिजित याला टकल्या म्हणून हिणवू लागली. त्यावेळेस धीरज यांनी सांगितले की, आमची आई मयत झाल्याने आम्ही केस काढलेले आहेत, तु टकल्या बोलून आमचा आपमान करू नको. त्यावर अखिलेश आम्हाला म्हणाला की, ‘तुमको मालुम नही. मै. कोन हु सारी पोलीस मुझसे डरती है. अभी तुम्हारा मराठीपन निकालता हु. मुझे सिर्फ अधा घंटा दो, असे धमकावुन तो तेथुन निघुन त्याचे घरी गेला’, असा आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : मराठी माणसावरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद, अजितदादा कडाडले, अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी...
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement