Raju Shetty: शेतकरी काय भिकारी वाटला का? मदत किटवरील फोटोबाजीवर राजू शेट्टी भडकले
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
देताय काडीची मदत आणि गाजवाजा करताय, अशा चमकोगिरी करणाऱ्यांना शेतकऱ्यांनी चिखलात लोळवा, असे राजू शेट्टी म्हणाले.
कोल्हापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचं साहित्य पाठवलं आहे.मुंबई ठाण्यातून टेम्पो भरून साहित्य नुकसानग्रस्त भागात पाठवण्यात आले आहे.मात्र या साहित्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून जाहीरातबाजी करण्यात आली आहेय मदतीसाठी जे साहित्या पाठवण्यात आलंय, त्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचा फोटो छापण्यात आला आहे. मात्र या जाहीरातबाजीवरून आता नवा वाद निर्माण झालाय. अशा परिस्थितीतही जाहीरातबाजी केल्यानं विरोधकांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. फोटो लावून तुटपुंजी मदत देता शेतकरी काय भिकारी वाटला का? असा संतप्त सवाल शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.
भारतीय संस्कृतीत उजव्या हाताने दिलेली मदत डाव्या हाताला कळू द्यायची नाही अशी परंपरा आहे. मदत द्यायची तर सगळे पीक गेलंय त्याची भरपाई द्या, मग तुमचा भला मोठा फोटो लावा, मग आम्हाला हरकत नाही. देताय काडीची मदत आणि गाजवाजा करताय. माझं शेतकऱ्यांना एवढंच सांगणे आहे की, अशा चमकोगिरी करणाऱ्यांना शेतकऱ्यांनो चिखलात लोळवा, असे म्हणत राजू शेट्टी यांनी सरकारच्या मदतीवर निशाणा साधला आहे.
advertisement
देताय काडीची मदत आणि गाजवाजा करताय? राजू शेट्टींचा सवाल
राजू शेट्टी म्हणाले, संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. जणू काय जलप्रलय आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे असतील तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्ज महायुती सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे माफ करायला पाहिदे, ते राहिलं बाजूला... स्वत: मुख्यमंत्री सांगत आहे की सरासरीच्या 110 टक्के पाऊस पडला आहे. ओला दुष्काळ जाहीर करायला यापेक्षा दुसरा मोठा काय पुरावा पाहिजे. 10 मे पासून पाऊस पडतोय.
advertisement
शेतकऱ्यांची जी चेष्ठा लावली आहे ती अतिशय संतापजनक : राजू शेट्टी
शेतकऱ्याला जी तुटपुंजी मदत दिली जाते त्यावर नेत्यांचे फोटो, पक्षाचा लोगो, पक्षाचे नाव हे काय चाललंय? शेतकरी काय भिकारी आहे का त्याची चेष्ठा चालवली आहे. देऊन देऊन देताय काय अतिशय तुटपुंजी मदत ही पाण्यात बुडणाऱ्या माणसाला दिली आहे. तुमचे धंदे सगळे आम्हाला माहिती आहे, कुठून पैसा कमावला माहीत आहे. शेतकऱ्यांची जी चेष्ठा लावली आहे ती अतिशय संतापजनक आहे , असेही राजू शेट्टी म्हणाले.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raju Shetty: शेतकरी काय भिकारी वाटला का? मदत किटवरील फोटोबाजीवर राजू शेट्टी भडकले