सगळे झोपलेले होते अन् ते कोयते घेऊन मानगुटीवर बसले, धाराशिवचा LIVE VIDEO

Last Updated:

चोरी, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कधीही चोरीच्या, दरोड्याच्या घटना घडत असतात. या घटनांचे सीसीटीव्ही व्हिडीओही बऱ्याच वेळा सोशल मीडियावर समोर येतात.

सगळे झोपलेले होते अन् ते कोयते घेऊन मानगुटीवर बसले
सगळे झोपलेले होते अन् ते कोयते घेऊन मानगुटीवर बसले
बालाजी निरफळ, धाराशिव : चोरी, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कधीही चोरीच्या, दरोड्याच्या घटना घडत असतात. या घटनांचे सीसीटीव्ही व्हिडीओही बऱ्याच वेळा सोशल मीडियावर समोर येतात. अशीच आणखी एक दरोड्याची घटना समोर आलीय, ज्यामध्ये पेट्रोल पंपावर मध्यरात्री सशस्त्र दरोडा. ही धक्कादायक घटनेचा लाईव्ह व्हिडीओ सध्या समोर आलाय.
कळंब पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री कोयत्याचा धाक दाखवून दरोडेखोरांनी सुमारे सव्वातीन लाखाची रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कळंब शहरातील येरमाळा रोडवरील राजश्री पेट्रोल पंपावर हा सशस्त्र दरोडा पडला.
चोरीचो ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हे सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमत च्या हाती लागले आहे. चार दरोडेखोरांनी पंपावरील कामगारांना ऑफीसच्या चाव्याची मागणी केली मात्र कामगार चावी देत नसल्यानं कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील 3 लाख 28 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
advertisement
दरम्यान ही घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून अवघ्या चार मिनिटात दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोकड लंपास केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून 24 तासानंतर ही कुठलाच सुगावा लागलेला नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सगळे झोपलेले होते अन् ते कोयते घेऊन मानगुटीवर बसले, धाराशिवचा LIVE VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement