Thane: कोणत्या उमेदवारांना किती कोटींची ऑफर? राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत माणसंच समोर आणली!

Last Updated:

Thane Mahapalika Election: सेना-मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली.

राज ठाकरे
राज ठाकरे
ठाणे : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या दणदणीत सभेनंतर ठाकरे बंधूंची ठाण्यात सभा पार पडत आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाकडून पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप होत असल्याचा आरोप करून उमेदवारांनाही कोटींच्या ऑफर दिल्या जात असल्याचे सांगितले. तसेच ज्या ज्या उमेदवारांना पैशांच्या ऑफर्स दिल्या गेल्या त्यांना समोर आणून त्यांचे कौतुक केले.
ठाणे महानगर पालिकेत भाजप-शिंदेसेनेसमोर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे आव्हान आहे. सेना-मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यांना १५ कोटींची ऑफर्स दिली गेली, राज ठाकरेंनी माणसं समोर आणली

आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या, पण यावेळची निवडणूक वेगळी आहे. सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा पाऊस पाडला जातोय. भाजपचे लोक पैसे वाटतायेत, शिंदेंचे लोक पैसे वाटतायेत. लोकांना मतदानासाठी पैसे वाटले जातायेत. उमेदवारांना देखील निवडणूक न लढविण्यासाठी कोटीच्या कोटी ऑफर्स दिल्या जातायेत. मी फक्त दोन तीन नाव घेतो. शैलेश धात्रक, मनिषा धात्रक, पुजा धात्रक, प्रभागात ४ जण उभे होते. किती पैशांची ऑफर्स दिली असेल? तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. या तीन लोकांना एका घरात १५ कोटींची ऑफर दिली होती. मला त्यांना इकडे बोलायचे होते. त्यांनी पैसे नाकारून निवडणुकीला उभे राहिले आहे. १५ कोटींची ऑफर्स त्यांनी धुडकावली.
advertisement
सुशील आवटे यांना एक कोटीची ऑफर झाली होती. मंचावर असलेल्या महिलेला ५ कोटींची ऑफर दिली होती. आले कुठून पैसे, टांकसाळ उघडली की काय? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. या लोकांना काही लगामच नाहीये. जे काही हवंय ते बिनधास्त यांना करायचंय, कोणत्याच यंत्रणांकडे याचे उत्तर नाहीये, असे राज ठाकरे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane: कोणत्या उमेदवारांना किती कोटींची ऑफर? राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत माणसंच समोर आणली!
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement