'एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार', फडणवीसांच्या विधानावर राज ठाकरेंचं खास उत्तर, म्हणाले 'संजय राऊत...'
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाकरे बंधूंनी एकत्रित पत्रकार परिषद घेत जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळी ठाकरे बंधूंनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे आणि ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यासाठी २० वर्षानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनावर आले. यावेळी त्यांनी शिवसेना भवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, ठाकरे बंधूंनी एकत्रित पत्रकार परिषद घेत जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळी ठाकरे बंधूंनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरी शैलीत उत्तर दिलं. शनिवारी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी शिंदेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ असा केला होता. या वक्तव्याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी खास शैलीत याला उत्तर दिलं आहे.
advertisement
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारलं असता राज ठाकरे यांनी सुरुवातीला फक्त स्मितहास्य करत उत्तर दिलं. पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली, तेव्हा राज ठाकरे म्हणाले, "मी हसलो खरं तर, मी नंतर हसलो. मी शांतपणे हसलो... संजय राऊत जोरात हसले... हे त्याचं उत्तर..." असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांचं वक्तव्य विनोद होता. त्यावर आपण हसलो, असं सांगण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला.
advertisement
देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापाच्या, बापाच्या, बापामध्ये नाही. आमच्या बरोबर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आहेत. जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचारांचा वारसा कर्माने मिळू शकतो, तो विचारांचा वारसा एकनाथ शिंदेंकडे आहे. आमच्या महायुतीकडे आहे. आता मुंबईकर जागा झाला आहे, विकासाचा धागा झाला आहे. मी तुम्हाला हीच विनंती करतो ही निवडणूक मुंबईसाठी महत्वाची आहे. मला काही पत्रकार म्हणाले दोन भाऊ एकत्र आले, आता तुम्ही कसं लढणार? मी त्यांना सांगितलं देखकर धुंदलीसी ताकद हौसला हमारा कम नहीं होता, अरे झुठी आँधीयोंसे वही डरे जिन चिरागो में दम नहीं होता. मला तर लक्षात आलं की श्रेय चोरणारी टोळी मुंबईत सक्रीय आहे. काही अबोध बालकं आहेत ती म्हणतात सगळं आम्हीच केलं. अर्ध्या रात्रीत मुंबईकरांना विचारलं तरीही मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं. विकासाच्या प्रत्येकात खोडा कुणी घातला हे मुंबईकरांना विचारलं तर ते एकच नाव घेतील ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 2:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार', फडणवीसांच्या विधानावर राज ठाकरेंचं खास उत्तर, म्हणाले 'संजय राऊत...'










