Jay Dudhane Arrest: हनिमूनला जातानाच पोलिसांनी घातल्या बेड्या, अटकेनंतर जय दुधाणेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'मी घाबरत नाही...'

Last Updated:
Jay Dudhane Arrest: 'बिग बॉस मराठी ३' चा उपविजेता आणि 'स्पिट्सविला'चा विजेता जय दुधाणे याला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं.
1/8
मुंबई: लग्नाच्या गोड आठवणींचा रंग ओसरला नव्हता, तोच रंगाचा बेरंग झाला आहे. अभिनेता जय दुधाणेला बेड्या पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली.
मुंबई: लग्नाच्या गोड आठवणींचा रंग ओसरला नव्हता, तोच रंगाचा बेरंग झाला आहे. अभिनेता जय दुधाणेला बेड्या पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली.
advertisement
2/8
'बिग बॉस मराठी ३' चा उपविजेता आणि 'स्पिट्सविला'चा विजेता जय दुधाणे याला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं.
'बिग बॉस मराठी ३' चा उपविजेता आणि 'स्पिट्सविला'चा विजेता जय दुधाणे याला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं.
advertisement
3/8
मात्र, या अटकेनंतर जयने दिलेली पहिली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे.
मात्र, या अटकेनंतर जयने दिलेली पहिली प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरत आहे. "मी गुन्हेगार नाही, तर परिस्थितीचा बळी आहे," असा दावा करत जयने आपली बाजू मांडली आहे.
advertisement
4/8
२४ डिसेंबरला जयने हर्षला पाटीलशी लग्न केलं. जय, त्याची पत्नी, भाऊ आणि भावजय असे चौघेजण हनिमूनसाठी परदेशात जायला निघाले होते. मात्र, इमिग्रेशन काउंटरवर पोहोचताच त्याला पोलिसांनी रोखलं.
२४ डिसेंबरला जयने हर्षला पाटीलशी लग्न केलं. जय, त्याची पत्नी, भाऊ आणि भावजय असे चौघेजण हनिमूनसाठी परदेशात जायला निघाले होते. मात्र, इमिग्रेशन काउंटरवर पोहोचताच त्याला पोलिसांनी रोखलं.
advertisement
5/8
या प्रसंगावर बोलताना जय म्हणाला,
या प्रसंगावर बोलताना जय म्हणाला, "माझ्या नावावर अटकेचं वॉरंट आहे, हे मलाच माहीत नव्हतं. मी कुठेही पळून जात नव्हतो. मी हनिमूनसाठी जात होतो, पण पोलिसांनी सांगितलं की तुम्ही देश सोडून जाऊ शकत नाही. मी कायद्याला घाबरत नाही, म्हणूनच मी पळून न जाता पोलिसांना सामोरं गेलो."
advertisement
6/8
५ कोटींच्या गाळ्यांच्या व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपांवर जयने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला,
५ कोटींच्या गाळ्यांच्या व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपांवर जयने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "मी वडिलांची जबाबदारी घेतली, त्यांचा व्यवसाय सांभाळला, पण आज लोक माझ्यावरच उलटले आहेत. गाळे विकल्याच्या अफवा कोण पसरवतंय तेच कळत नाही. जर मी काही चुकीचं केलं असेल तर ते सिद्ध करून दाखवा."
advertisement
7/8
जयच्या घरातील वृद्ध आजी-आजोबा, आई आणि बहीण यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने तो व्यथित झाला आहे.
जयच्या घरातील वृद्ध आजी-आजोबा, आई आणि बहीण यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने तो व्यथित झाला आहे. "माझ्या आजी-आजोबांना तरी यात ओढायला नको होतं. हा पूर्णपणे खोटा गुन्हा आहे आणि म्हणूनच मी माझा चेहरा लपवत नाहीये. सत्य लवकरच समोर येईल," असा विश्वास त्याने व्यक्त केला.
advertisement
8/8
काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेला जय सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. आयुष्यात येणाऱ्या अशा संकटांना सामोरं जाण्याची हिंमत माझ्यात आहे, असं त्याने ठामपणे सांगितलं. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी निर्दोष सुटेन, असंही तो म्हणाला.

BMC Election Neil Somaiya : सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड १०७ मधलं गणित बदललं
सोमय्यांकडून मुलाविरोधातील लढतीत कोणी नसल्याचा दावा, ठाकरे गटाचा मोठा डाव, वॉर्ड
  • नील सोमय्या यांच्याविरोधात ठाकरेंचा उमेदवार नसल्याचा दावा केला होता.

  • नील सोमय्या यांचा विजय सहज सोपा झाला असल्याचा दावा करण्यात आला होता.

  • मात्र, आता ठाकरे गटाने आता मोठा डाव खेळला आहे.

View All
advertisement