'नवरात्रीच्या काळात मशिदींनाही लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी द्या', अबू आझमींची मागणी

Last Updated:

या ना त्या वक्तव्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी हे कायम वादात असतात. आता आझमी यांनी पुन्हा

News18
News18
मुंबई: गणेशोत्सवानंतर आता राज्यभरात नवरात्री उत्सवाचा सुरुवात झाली आहे. सर्वत्र गरबा आणि रास दांडियाची धूम आहे. अशातच   समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी वेगळीच मागणी केली आहे. 'ज्याप्रमाणे इतर सण आणि नवरात्रात लाऊडस्पीकरच्या वापरात सवलती दिल्या जातात त्याचप्रमाणे अजानसाठी लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात यावी' अशी मागणी आझमी यांनी केली आहे.
या ना त्या वक्तव्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी हे कायम वादात असतात. आता आझमी यांनी पुन्हा एकदा नवरात्री उत्सवाच्या दरम्यान वेगळीच मागणी केली आहे.
'ज्याप्रमाणे इतर सण आणि नवरात्रात लाऊडस्पीकरच्या वापरात सवलती दिल्या जातात त्याचप्रमाणे अजानसाठी लाऊडस्पीकरला परवानगी देण्यात यावी. उत्तर प्रदेशात नवरात्रात लाऊडस्पीकरच्या वापरावरील सवलतीवर भाष्य करताना अबू आसिम आझमी यांनी ही मागणी केली.
advertisement
तसंच, देशातील सर्व सणांवर सवलती देण्यात याव्यात कारण लोक उत्सवांमध्ये रात्री उशिरापर्यंत उत्सव साजरा करतात आणि लाऊडस्पीकरला रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी आहे. याशिवाय, मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देण्यासोबतच, डेसिबल मर्यादा ओलांडण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करावा. डेसिबल खूप कमी आहे, ज्यामुळे त्यात लाऊडस्पीकर वापरणे अशक्य आहे. म्हणून लाऊडस्पीकरबाबत सरकारने धोरण तयार करण्याची मागणीही आझमींनी केली आहे.
advertisement
'नवरात्रात किंवा इतर सणांमध्ये लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी आणि सवलत देण्यास मुस्लिमांचा कोणताही आक्षेप नाही, परंतु सरकारने दुहेरी मानके स्वीकारणे टाळावं. नमाजासाठी अजान दोन किंवा पाच मिनिटे असते, परंतु मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत कारण डेसिबल मर्यादा अत्यंत कमी आहे. म्हणून, सरकारने मशिदींमध्ये लाऊडस्पीकर बसवण्याची परवानगी द्यावी' अशी मागणीही आझमींनी केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'नवरात्रीच्या काळात मशिदींनाही लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी द्या', अबू आझमींची मागणी
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement