जागा वाढवल्या पण शिंदेंची केली गोची, भाजपनं मुंबईत खेळला नवा डाव, वर्षावरील बैठकीची Inside Story
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून महायुतीमधील जागावाटपाचा पेच वाढत चालला आहे. अशात भाजपनं मुंबईत नवा डाव खेळला आहे. ज्यामुळे शिंदेंची गोची होण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून महायुतीमधील जागावाटपाचा पेच वाढत चालला आहे. भारतीय जनता पक्षाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ८० ते ८५ जागा देण्याचा नवा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसाच्या निवासस्थानी खलबतं झाली. मुंबईत १०० पेक्षा जास्त जागा मिळवण्यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतं.
भाजपाचा ८०-८५ जागांचा नवा प्रस्ताव
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाने शिवसेनेला ८० ते ८५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित जागांवर भाजपा स्वतः उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत सन्मानजनक जागा मिळाव्यात, यासाठी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे हा आकडा १०० च्या आसपास नेण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. किमान ११२ जागा मिळाव्यात यासाठी शिंदे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
advertisement
बैठकीत काही जागांबाबत एक वेगळाच फॉर्म्युला चर्चेत आला आहे. ज्या जागांवर शिवसेनेची ताकद आहे, पण प्रबळ उमेदवार नाही, अशा ठिकाणी भाजपाचा ‘आयात उमेदवार’ शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाली आहे. म्हणजेच उमेदवार भाजपाचा असेल, पण तो शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवेल. यामुळे शिवसेनेला जागांचा आकडा वाढवता येईल आणि भाजपाला आपली माणसे निवडून आणता येतील. ज्या जागांवर उमेदवार आयात केल्याशिवाय विजय सोपा नाही, अशा ठिकाणी हा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
मध्यरात्रीची बैठक आणि पुढची रणनीती
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत काही वादग्रस्त जागांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली. मुंबईत आपली पकड मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना किमान ११२ जागांची अपेक्षा आहे, मात्र भाजपाने सध्या ८० ते ८५ जागांवर मर्यादित राहण्याचा प्रस्ताव दिल्याने शिंदे सेनेची धाकधूक वाढली आहे. त्यांना १०० च्या आत जागांवर समाधान मानावं लागू शकतं, अशाही चर्चा आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 23, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जागा वाढवल्या पण शिंदेंची केली गोची, भाजपनं मुंबईत खेळला नवा डाव, वर्षावरील बैठकीची Inside Story











