Tricks And Tips : वंदे भारत ट्रेन महाग वाटते? तिकीट बुक करताना 'हा' पर्याय निवडा, वाचतील 200-300 रुपये
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Save Money On Vande Bharat Express Ticket : भारताच्या रेल्वे क्षेत्रातील अभिमान असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही आधुनिक, वेगवान आणि सुविधांनी परिपूर्ण ट्रेन म्हणून ओळखली जाते. आरामदायी सीट्स, स्वच्छ डबे, जलद प्रवास आणि आधुनिक सेवा यामुळे प्रवाशांचा या ट्रेनकडे ओढा वाढत आहे. मात्र अनेक प्रवाशांना वंदे भारतचे तिकीट तुलनेने महाग वाटते. परंतु तुम्ही यातील 200 ते 300 रुपये वाचवू शकता. चला पाहूया कसे.
advertisement
वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी-हायस्पीड ट्रेन असल्याने तिचा प्रवासाचा वेळ कमी असतो. यासोबतच ट्रेनमध्ये एअर-कंडिशनिंग, आरामदायी खुर्च्या, ऑटोमॅटिक दरवाजे, स्वच्छ टॉयलेट्स, डिजिटल डिस्प्ले आणि ऑनबोर्ड सेवा दिल्या जातात. या सर्व सुविधांचा खर्च तिकीट दरात समाविष्ट असतो. त्यामुळे वंदे भारतचे भाडे अधिक असते.
advertisement
अनेक प्रवाशांना माहित नसते की, वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटामध्ये जेवणाचा खर्च आधीच समाविष्ट असतो. प्रवासाच्या वेळेनुसार नाश्ता, जेवण किंवा स्नॅक्स दिले जातात आणि यासाठी साधारण 200 ते 300 रुपये अतिरिक्त आकारले जातात. तुम्हाला ट्रेनमधील जेवण नको असेल, तरीही डिफॉल्ट सेटिंगमुळे हा चार्ज तिकीटात जोडला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










