मुंबईत काँग्रेसकडून वंचितला 45 जागा, 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Last Updated:

Mumbai Mahanagar Palika Election: मुंबई महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित आघाडीत काँग्रेसने वंचितला एकूण ४५ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.

News18
News18
महानगर पालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी (२ जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तिकीट न मिळाल्याने राज्यभरात अनेक बंडखोरांनी पक्षाच्या विरोधात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या दिवशी नेत्यांकडून मनधरणी केल्यानंतर बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पण काही ठिकाणी उमेदवारांनी बंडखोरी कायम ठेवत, निवडणूक लढण्याचा निर्णय अंतिम केला. यानंतर आता राज्यभरात कोणत्या महानगर पालिका निवडणुकीत कोण कुणाविरोधात लढत आहे, याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुंबईत कशी निवडणूक असणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता इथलं चित्र देखील स्पष्ट झालं आहे. तिथं बहुतांशी प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. तर काही ठिकाणी चौरंगी निवडणुकीची अपेक्षा आहे. इथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना बघायला मिळेल, अशी अपेक्षा असताना महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडल्याचं बघायला मिळालं.
advertisement
इथं भाजप-शिवसेना, ठाकरे बंधू, आणि काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी अशा तीन युती झाल्या आहेत. मुंबईत अजित पवार गटाकडूनही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेस वंचित आघाडीत काँग्रेसने वंचितला एकूण ४५ जागा सोडल्या आहेत. तर पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.

मुंबई महानगर पालिका वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण यादी

क्रमांकवार्ड क्रमांकउमेदवाराचे नाव
124सरोज दिलिप मगर
227संगिता दत्तात्रय शिंगाडे
338तेजस्विनी उपासक गायकवाड
442रेवाळे मनिषा सुरेश
553नितीन विठ्ठल वळवी
654राहुल ठोके
756ऊषा शाम तिरपुडे
867पिर महमंद मुस्ताक शेख
968पलमजित सिंह गुंबंर
1073स्नेहा मनोज जाधव
1176डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
1285अय्यनार रामस्वामी यादव
1388निधी संदीप मोरे
1495विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
1598सुदर्शन पिठाजी येलवे
16107वैशाली संजय सकपाळ
17108अश्विनी श्रीकांत पोचे
18111अँड रितेश केणी
19113सुर्यकांत शंकर आमणे
20114सिमा निनाद इंगळे
21118सुनिता अंकुश वीर
22119चेतन चंद्रकांत अहिरे
23121दिक्षिता दिनेश विघ्ने
24122विशाल विठ्ठल खंडागळे
25123यादव राम गोविंद बलधर
26124रीता सुहास भोसले
27127वर्षा कैलास थोरात
28139स्नेहल सोहनी
29146सतिश वामन राजगुरू
30155पवार ज्योती परशुराम
31157सोनाली शंकर बनसोडे
32160गौतम भिमराव हराळ
33164आशिष प्रभु जाधव
34169स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
35173सुगंधा राजेश सोंडे
36177कुमुद विकास वरेकर
37193भुषण चंद्रशेखर नागवेकर
38194शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
39195पवार ओमकार मोहन
40196रचना अविनाश खुटे
41197डोळस अस्मिता शांताराम
42199नंदिनी गौतम जाधव
43202प्रमोद नाना जाधव
44207चंद्रशेखर अशोक कानडे
45225विशाल राहुल जोंजाळ
advertisement

काँग्रेस वंचितमधील मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार

अ.क्र.वॉर्ड क्रमांकउमेदवाराचे नाव
46वॉर्ड 116राजकन्या विश्वास सरदार
47वॉर्ड 125सुमित कासारे
48वॉर्ड 133सुप्रीया मनोज जाधव
49वॉर्ड 140सोहन दादु सदामस्त
50वॉर्ड 181अजिंक्य पगारे
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत काँग्रेसकडून वंचितला 45 जागा, 5 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement