advertisement

पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा, नालासोपाऱ्यात सराईत टोळी जेरबंद!

Last Updated:

क्राईम ब्रँचचे बनावट पोलीस बनून २ लाख ६९ लाखांची लूट केल्याप्रकरणात चार तासांत गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी आरोपींना गजाआड केले. त्यांच्याकडून १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आचोळे पोलीस
आचोळे पोलीस
विजय देसाई, प्रतिनिधी, वसई विरार : नालासोपाऱ्यात पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीला आचोळे पोलीस ठाणे यांच्या पथकाने अवघ्या चार तासांत जेरबंद केले आहे. टोळीकडून १५ लाखांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
युको बँकेतून २० फेब्रुवारी रोजी २ लाख ६९ हजार रूपये काढल्यानंतर फिर्यादीला आम्ही क्राईम ब्रँच ठाणेचे पोलीस आहोत असे सांगत जबरदस्ती कारमध्ये बसवून मारहाण करण्यात आली आणि रक्कम लंपास करण्यात आली होती.
तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, कार, तीन मोटारसायकली आणि मोबाईल असा तब्बल १४ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोलीस असल्याची बतावणी करून दरोडा, नालासोपाऱ्यात सराईत टोळी जेरबंद!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement