Pune Land: शीतल तेजवानी गैरव्यवहारातील बडा मासा! कसा झाला व्यवहार? मोठी माहिती समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
प्रशांत बाग, प्रतिनिधी, मुंबई : पुण्यातील महार वतनाच्या 40 एकर जमिनीच्या व्यवहाराबाबत मोठी अपडेट समोर आली. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर होत असलेल्या जमीन व्यवहारांच्या आरोपांबाबत महत्त्वाचे पुरावे समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे.
बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 2014 ला न्यायालयाने तेजवाणी, मूळ मालकांचा दावा फेटाळला होता.
शीतल तेजवानीवर आरोप काय?
शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री केलेली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
advertisement
कागदपत्रांची फेरफार करून शासनाची दिशाभूल?
जमिनीच्या 7/12 वर महाराष्ट्र शासन नोंद असल्याने हा व्यवहार होणे निव्वळ अशक्य आहे. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या जमनिचा करार 2038 पर्यंत पुणे बोटॅनिकल गार्डनशी करण्यात आला होता. त्यामुळे त्याआधी कायदेशीर व्यवहार होणे अशक्य होते. तरीही जमिनीचा जुना सातबारा दाखवून हा व्यवहार करण्यात आल्याचे सांगितले जाते.
मूळ मालकांच्या वारसांनी विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. तो अर्ज विभागीय आयुक्तांनी फेटाळला. 2013 ला तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडे दाद मागण्यात आली. थोरातांनी मूळ मालकांचं अपील फेटाळलं. 2014 ला मूळ मालकांच्या वतीनं पॅरामाऊंटच्या शीतल तेजवाणीने कोर्टात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही देखील मूळ मालकांचा दावा फेटाळला.
advertisement
कायदा काय सांगतो?
- खोटे दस्तावेज तयार करून जमीन विक्री करणारे जबाबदार
- शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात
- खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी करणारेही जबाबदार
- 'अमेडिया'चे संचालकही कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता
- स्टॅम्प ड्युटी माफ करणारे नोंदणी आणि मुद्रांक शुल्कचे विभागाचे अधिकारीही जबाबदार
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 8:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Land: शीतल तेजवानी गैरव्यवहारातील बडा मासा! कसा झाला व्यवहार? मोठी माहिती समोर


