आधी केंद्रात मंत्रिपद, आता दक्षिणेची मोहीम, भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी

Last Updated:

राज्यातील पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्र सरकारने हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता संघटनात्मक जबाबदारी दिली आहे.

मुरलीधर मोहोळ (केंद्रीय मंत्री)
मुरलीधर मोहोळ (केंद्रीय मंत्री)
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण संघटनात्मक फेरबदल जाहीर केले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, प्रभारी म्हणून वरिष्ठ नेते बैजयांता पांडा यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभा निवडणुका होणार असल्याने या नियुक्तीला विशेष महत्त्व आहे.
तामिळनाडूत भाजपचा विस्तार करण्यासाठी गेल्या काही वर्षांत पावले उचलली जात आहेत. मात्र, राज्यात द्रविड पक्षांचे वर्चस्व कायम असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत संघटनशक्ती वाढवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनुभवी नेत्यांना जबाबदाऱ्या देण्याची रणनीती पक्षाने आखली आहे.
बैजयांता पांडा हे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून तामिळनाडूत त्यांनी मागील काही काळापासून कार्यरत राहून संघटन बळकटीसाठी प्रयत्न केले आहेत. तर, महाराष्ट्रातील तरुण नेते म्हणून ओळखले जाणारे मुरलीधर मोहोळ यांना सहप्रभारी करून पक्षाने नव्या पिढीला पुढे आणण्याचा संदेश दिला आहे. मोहोळ हे पुण्याचे खासदार असून त्यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याचा स्वभाव पक्ष संघटनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
advertisement
भाजपकडून तामिळनाडूत निवडणुकीपूर्वी व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्नांबरोबरच केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार आणि राष्ट्रीय नेतृत्वाचे कार्यक्रम यावर भर दिला जाईल.
या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या तामिळनाडूतील निवडणूक रणनीतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुढील काही महिन्यांत या टीमकडून राज्यात आक्रमक मोहीम राबवली जाणार असून त्याचा निकाल थेट विधानसभा निवडणुकीत दिसून येईल.
advertisement
राज्यातील पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले मुरलीधर मोहोळ यांना केंद्र सरकारने हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर आता संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने दक्षिण भारतामध्ये पाय मजबूत करण्याकरता जोरदार प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी डॉ. सी आर राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली होती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी केंद्रात मंत्रिपद, आता दक्षिणेची मोहीम, भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement