Nagpur Accident : नागपूरातील राष्ट्रीय महामार्ग ठरला मृत्यूचा मार्ग, 3 वर्षात 15 हजार लोकांनी गमावला जीव

Last Updated:

आरटीआय म्हणजेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे हे नागपूरकरांशी जीवाशी खेळण्यासारखे आहे

nagpur accident news
nagpur accident news
Nagpur Accident News : मुंबईच्या कुर्ला परिसरात एक भरधाव बसने 7 जणांना चिरडून 50 लोकांना जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आता ही घटना ताजी असताना नागपूरातून रस्ते अपघाताची एक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार नागपूरातल्या राष्ट्रीय महामार्गावर 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान तब्बल 14 हजार 783 लोकांचा मृत्यू झाला आहे.याचाच अर्थ राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा मार्ग बनत चालला आहे. ही झाली राष्ट्रीय महामार्गाची आकडेवारी, तर राज्याची आकडेवारी यापेक्षा किंचितशी कमी आहे.त्यामुळे आता रस्ते अपघात रोखण्याचे प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे.
नागपूरात गेल्या काही वर्षापासून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आरटीआय म्हणजेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे हे नागपूरकरांशी जीवाशी खेळण्यासारखे आहे.या अपघातांवर नियंत्रण आणणे खूप गरजेचे आहे.
advertisement
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर 2021 या वर्षात 7 हजार 501 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. या अपघातात 4080 नागरीकांनाच मृत्यू झाला होता तर 5 हजार 901 नागरिक जखमी झाले होते. याच वर्षी राज्य महामार्गावरील अपघाताची आकडेवारी पाहिली असता 6 हजार 328 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये 3 हजार 411 लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता तर 5 हजार 078 नागरिक जखमी झाले होते.
advertisement
दरम्यान 2022 यावर्षी झालेल्या अपघाताची माहिती पाहिली असता, राष्ट्रीय महामार्गावर 9 हजार 417 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. या अपघाताच्या घटनेत 4 हजार 023 लोकांचा मृत्यू झाला, तर 8 हजार 174 नागरीक जखमी झाले आहेत. याचवर्षी राज्य महामार्गावर 4 हजार 822 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये 2 हजार 548 नागरीकांचा मृत्यू झाला आहे तर 3 हजार 851 नागरीक जखमी झाले होते.
advertisement
तर 2023 या वर्षात राष्ट्रीय महामार्गावर 10 हजार 881 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. या अपघातात 5 हजार 780 नागरीकांचा मृत्यू झाला तर 9 हजार 474 जखमी झाले आहे. याचवर्षी राज्य महामार्गावर 4 हजार 822 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये 2 हजार 548 नागरीकांचा मृत्यू झाला होता, तर 3 हजार 851 जण जखमी झाले होते.
advertisement
तर जानेवारी 2024 ते आक्टोंबर 2024 दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर 948 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. या घटनेत 4 हजार 681 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 हजार 047 जखमी झाले आहेत. याच कालावधीत राज्य महामार्गावर 4 हजार 822 अपघाताच्या घटना घडल्या होत्या. या अपघाताच्या घटनांमध्ये 2 हजार 548 नागरीकांचा मृत्यू झाला आहे तर 3 हजार 851 नागरीक जखमी झाले होते.
advertisement
दरम्यान ही सगळी आकडेवारी पाहिली असता राज्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यूच्या घटना जास्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे.आता राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचे प्रमाण रोखणे प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Accident : नागपूरातील राष्ट्रीय महामार्ग ठरला मृत्यूचा मार्ग, 3 वर्षात 15 हजार लोकांनी गमावला जीव
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement