advertisement

IAS Transferred: 24 तासांत आणखी एका मोठ्या IAS अधिकाऱ्याची बदली, नागपूरला मिळाले नवे आयुक्त!

Last Updated:

नागपूरच्या आयुक्तपदी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची बदली करण्यात आली आहे.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिदी
नागपूर : राज्यात महापालिका निवडणुका नुकत्याच संपल्या असून आता महापौर सुद्धा विराजमान झाले आहे. त्यामुळे कोविड काळापासून सुरू असलेली प्रशासकीय सत्ता आता संपुष्टात आली आहे. अशातच आता आयुक्यांच्या बदलीचा धडका सुरू झाला आहे.  नागपूर महानगर पालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. आता नागपूरच्या आयुक्तपदी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची बदली करण्यात आली आहे. डॉ विपीन इटनकर यांच्याकडे आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे.
advertisement
नागपूर मनपाचे आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांची बदली करण्यात आली आहे. अभिजित चौधरी यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे. त्यानंतर आता डॉ विपीन इटनकर यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त चार्ज देण्यात आला होता. आज डॉ विपीन इटनकर यांना आयुक्त म्हणून बदली देण्यात आली आहे.
काय म्हटलं आदेशात? 
शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर या रिक्त पदावर ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा. तसेच पुढील आदेश होईपर्यंत जिल्हाधिकारी, नागपूर या पदाचा अतिरिक्त कार्यभारही आपण धारण करावा, असा आदेश सामान्य प्रशासन विभागााकडून सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्याकडून काढण्यात आला आहे.
advertisement
डॉ विपीन इटनकर यांची कारकिर्द
डॉ. विपीन इटनकर हे भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) एक अनुभवी अधिकारी आहेत. प्रशासनात येण्याआधी त्यांनी MBBS पूर्ण केलं. ते व्यवसायाने डॉक्टर सुद्दा आहेत. इटनकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून २०१४ च्या बॅचमधून भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला होता. आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. सध्या इटनकर हे नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसंच, याआधी त्याांनी  चंद्रपूरमध्येही जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: 24 तासांत आणखी एका मोठ्या IAS अधिकाऱ्याची बदली, नागपूरला मिळाले नवे आयुक्त!
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement