नागपूरच्या कोराडी मंदिर मार्गावर बांधकाम स्थळी अपघात, काही मजूर दबल्याची भीती
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nagpur News: स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक बांधकामाचा काही भाग कोसळला. या स्लॅबखाली काही मजूर दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी, नागपूर : नागपुरातील कोराडी मंदिराजवळ प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची माहिती मिळत आहे. काही मजूर दबल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. आपत्कालीन सेवा आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे.
मंदिर परिसरात गेटचे बांधकाम सुरू आहे. गेटचा स्लॅब टाकण्यात येत होता. शनिवारी सायंकाळी १५ पेक्षा अधिक मजूर तेथे काम करीत होते. रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला. त्याखाली मजूर दबले गेले. तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी आणि मजुरांनी मदतीसाठी आरडाओरड केली. भाविकांमध्येही गोंधळ उडाला.
नेमके काय घडले?
कोराडी ते मंदिर मार्गावरील गेटचे निर्माण कार्य सुरू आहे. मंदिराच्या गेट क्रमांक चार जवळ स्लॅबचे काम सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक बांधकामाचा काही भाग कोसळला. या स्लॅबखाली काही मजूर दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलीस आणि आपत्कालिन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन विभागाचे जवानही लगोलग घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिकांच्या मदतीने पोलिस आणि जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली. काही जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्यापही बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 09, 2025 10:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नागपूरच्या कोराडी मंदिर मार्गावर बांधकाम स्थळी अपघात, काही मजूर दबल्याची भीती


