बालपणीच गेली दृष्टी, पण चमकण्याची जिद्द कायम, RJ शाहनवाज कसा बनला रेडिओचा बादशाह? Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची कला आणि लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य यामुळे शाहनवाज रेडिओकडे ओढला गेला.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
नागपूर: जिद्द, मेहनत आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर कोणतंही यश अशक्य नसतं. नागपुरातील प्रसिद्ध रेडिओ जॉकी शाहनवाज अन्सारी यानं आपल्या कृतीतून हेच दाखवलं आहे. जन्माने अंध असूनही आपल्या कौशल्यानं त्यानं रेडिओच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. 'रात बाकी, बात बाकी' या शोद्वारे आरजे शाहनवाज घराघरात पोहोचला. तसेच ऑरेंज एफएमसह देशातील लोकप्रिय 13 स्टेशनवरून तो लोकांचं मनोरंजन करतोय.
advertisement
बालपणीच गेली दृष्टी
आरजे शाहनवाज अन्सारी याची बालपणीच आजारपणामुळे दृष्टी गेली. त्यामुळे पुढील जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही त्याने हार मानली नाही. परिस्थितीशी संघर्ष करत आपल्या ध्येयाचा पाठलाग सुरूच ठेवला. प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघण्याची कला आणि लोकांशी संवाद साधण्याचं कौशल्य यामुळे शाहनवाज रेडिओकडे ओढला गेला. देशातील प्रसिद्ध आरजे मिलिंद यांनी शाहनवाजचं कौशल्य ओळखून त्याला प्रशिक्षण दिलं. त्यामुळंच आपल्याला एक दिशा मिळाल्याचं शाहनवाज सांगतो.
advertisement
आरजे बनण्यासाठी पाहिजे हे कौशल्य
"जर तुम्हाला चांगला आरजे बनायचे असेल तर तुमच्यामध्ये लोकांशी संवाद साधण्याची, प्रत्येक घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि मोकळेपणाने बोलण्याची मूलभूत कला असणे आवश्यक आहे," असे आरजे शाहनवाज सांगतो. तसेच एखाद्याचे स्वप्न खरे असेल तर त्याला कोणतीही अडचण रोखू शकत नाही. आता रेडिओ हे माझे संपूर्ण आयुष्य असून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी आरजे राहीन. हेच माझे जीवन आहे, असेही शाहनवाज म्हणतो.
advertisement
दरम्यान, बालपणापासून अंध असूनही रेडिओसारख्या क्षेत्रात आरजे शाहनवाजने मोठं नाव कमावलंय. त्यामुळे त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
May 15, 2024 5:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
बालपणीच गेली दृष्टी, पण चमकण्याची जिद्द कायम, RJ शाहनवाज कसा बनला रेडिओचा बादशाह? Video