मंदिरात पाडला रक्ताचा सडा, पूजा सुरू असतानाच तरुणाकडून प्रेयसीवर हल्ला, गळ्यावर केले सपासप वार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Boyfriend Attack On Girlfriend: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केले.
Boyfriend Attack On Girlfriend: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केले. ही घटना हनुमान मंदिरात घडली असून, गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीवर सध्या नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी आणि आरोपी रोशन सोनेकर यांच्यात प्रेमसंबंध होते. रोशनचे लग्न झाल्यानंतरही त्यांचे संबंध कायम होते. या संबंधांमुळे रोशनने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. मात्र, त्यानंतर रोशन दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. तो सतत प्रेयसीला त्रास देऊ लागला आणि मारहाणही करत होता. त्यामुळे प्रेयसीने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
advertisement
याच कारणावरून चिडलेल्या रोशनने बुधवारी सकाळी प्रेयसी जेव्हा गावातील हनुमान मंदिरात पूजा करत होती, तेव्हा तिच्यावर हल्ला केला. हनुमानाच्या मूर्तीसमोरच रोशनने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपी रोशन सोनेकरला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका प्रियकराने अशाप्रकारे तरुणीवर मंदिरात हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
August 08, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
मंदिरात पाडला रक्ताचा सडा, पूजा सुरू असतानाच तरुणाकडून प्रेयसीवर हल्ला, गळ्यावर केले सपासप वार


